माघार कोण घेणार ; घोडेबाजार होणार का? तर्कवितर्कांना उधाण

नागपुरातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते ही निवडणूक लढत आहेत.
माघार कोण घेणार ; घोडेबाजार होणार का? तर्कवितर्कांना उधाण

नागपूर : विधान परिषद (Legislative Council) नागपूर (Nagpur) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर नागपूरच्या जागेकडे राज्याचे लक्ष लागून आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा घोडेबाजार होणार की नाही, हे लवकरच ठरणार आहे.

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते ही निवडणूक लढत आहेत. त्यांच्या या टर्नमुळे राजकीय विश्लेषकांनासुद्धा बुचकळ्यात टाकले आहे.

छोटू भोयर यांना भाजपनेच काँग्रेसमध्ये पाठविले असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. पण छोटू भोयर राजकारणात अशा नियोजनाचा प्यादा होतील, हे शक्य नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यांचा डीएनए भाजपचा आहे, पण अपेक्षित फळ न मिळाल्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असेही सांगणारा एक वर्ग भारतीय जनता पक्षात आहे.

माघार कोण घेणार ; घोडेबाजार होणार का? तर्कवितर्कांना उधाण
ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर भावना गवळी चौकशीसाठी आज उपस्थित राहणार ?

आपण भाजपचे नुकसान केले, यापेक्षा दुसरे कुठलेही मोठे समाधान त्यांना मिळणार नाही, असेही भाजपमध्ये बोलले जात आहे. दुसरीकडे विधानपरिषदेच्या राज्यातील सर्व जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनावश्यक घोडेबाजार होऊ नये, यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीतील सर्व नेते विचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज 26 नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आज माघार कोण कोण घेतो, यावरच या निवडणुकीत घोडेबाजार होणार की नाही, हे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.