विधानपरिषद निवडणूक : ५५९ पैकी ४९९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

‘अडथळे’ पार करत करत एक-एक करून सदस्यांच्या बसेस नागपुरात (In Nagpur) दाखल होत झाल्या. एकूण ५५९ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
Legislative Council Election
Legislative Council ElectionSarkarnama

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज दुपारी २ वाजेपर्यंत ८९.१० टक्के मतदान झाले. ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) सिमेवर थांबलेल्या मतदार सदस्यांच्या बसेसे एक-एक करून नागपूरात पोहोचल्या. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढला.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सिमेवर तीन वेगवेगळ्या रिसॉर्टमध्ये भाजपच्या सदस्य मतदारांना मुक्कामी ठेवण्यात आले होते. यामध्ये नगरपंचायतीचे सदस्य एका ठिकाणी, शहरातील दुसऱ्या, तर जिल्हा परिषेच्या सदस्यांना तिसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. ‘अडथळे’ पार करत करत एक-एक करून सदस्यांच्या बसेस नागपुरात दाखल होत झाल्या. एकूण ५५९ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यांपैकी आतापर्यंत ४९९ मतदारांनी आपला मताधिकार बजावला.

मतदान करताना मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदणे आवश्यक आहे. १,२ , ३ मराठी किंवा 1, 2, 3 इंग्रजी किंवा I, ॥, III अशा रोमन आकड्यांमध्ये आपला पसंती क्रमांक दर्शविणे आवश्यक आहे. शब्दांमध्ये पसंती क्रमांक नोंदविता येणार नाही. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल, स्पाय कॅमेरा, स्पाय पेन, कॅमेरा, टॅब, तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. एकूण १५ मतदान पथके यासाठी कार्य करीत आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत.

Legislative Council Election
सरपंचांनाही हवा विधानपरिषद निवडणूकीत मतदानाचा अधिकार, अन्यथा...

सर्व मतदान केंद्र तहसील कार्यालयाच्या आसपास असल्यामुळे मतदानाच्या दिवशी १० डिसेंबरला तहसील कार्यालय नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय, तहसील कार्यालय नरखेड, काटोल, रामटेक, उमरेड, मौदा, पारशिवनी, येथील सेतू केंद्र बंद ठेवली जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी धारा 144 लागू असल्यामुळे मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात इतर लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे, आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com