राजकारण्यांनो, तरुणांच्या हाती तलवार नव्हे काम द्या; अठरापगड जाती संघटनांचा एल्गार

दगड आणि तलवारी मुलांच्या हातात देण्याऐवजी हाताला रोजगार द्या,
social organizations
social organizationssarkarnama

चंद्रपूर : आधी कोरोनाचे (Corona) संकट आणि त्यानंतर महागाईने जनता त्रस्त असताना राजकर्त्यांनी लोकांना धीर देणे अपेक्षित होते. मात्र, सत्ताधारी असो कि विरोधक लोकांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. उलट त्यांच्याकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे भविष्यात दंगली होतील. यात सर्वसामान्य कुटुबांची घरे जळतील. त्यांचीच मुले उद्धध्वस्त होतील. हा जीवघेणा खेळ थांबवा. दगड आणि तलवारी मुलांच्या हातात देण्याऐवजी हाताला रोजगार द्या, अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील अठरापगड जातींच्या तब्बल बावीस संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडे केली आहे.

यांसदर्भात या समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी आज (ता. ३०) शनिवारी चंद्रपुरमध्ये (Chandrapur) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. अद्याप कोरोनाचे संकट गेले नाही. लाखो लोकांचे रोजगार बुडाले. कोट्यवधी छोट-मोठे उद्योग बंद पडले. आता कुठे पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महागाई, इंधनाचे दर गणनाला भिडले आहे. या वर राजकीय पक्ष बोलायला तयार नाहीत.

social organizations
आमदार गोपीचंद पडळकर यांना आता केंद्राची एक्स सुरक्षा!

प्रत्येकाला आपल्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार संविधानानेच दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य झिजवले. त्यांच्यामुळे आज आमचा बहुजन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर दुसरीकडे धार्मीक दंगली आणि तेढ निर्माण करण्यात आमच्याच समाजातील तरुण-मुलांचा वापर केला जातो. आजवरच्या अनेक दंगलीत हीच वस्तुस्थिती समोर आली आहे. आमच्या मुलांचा अशा पद्धतीने होणारा वापर चिंतेची बाब आहे. मात्र, यापुढे आम्ही बहुजन समाजातील मुलांचा दंगलीसाठी वापर होवू देणार नाही, असेही या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

आमच्या समाजातील मुले सर्वच पक्षात आहेत. त्यांनी प्रगती करावी, योग्य सभागृहात लोकांचे प्रश्न मांडावे. लोकांच्या मुलभूत प्रश्नासाठी लढावे. मात्र, धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी सामील सहभागी होऊ नये. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक नुकसान होईल. समाज आणि देशालाही याचा भुर्दंड सोसावा लागेल. धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली आमचीच मुले तुरुंगात जातात, राजकीय हेतू साध्य झाल्यावर त्यांना सोडविण्यासाठी कोणी पुढे येत नाही. आईवडिलांनाच आपल्या मुलांसाठी कचेरी आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. यात त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. कुटुंबालाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बहुजन समाजातील युवकांनी अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कुठल्याही आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, महागाई या खऱ्या समस्या आहेत. त्या दूर करण्याची आज खरी गरज आहे. त्यावर कोणी बोलायला तयार नाही. आम्ही मतदान साठीच केले होते काय असा प्रश्न समाज संघटना म्हणून आम्हाला पडला आहे. राजकीय प्रक्रियेत लोकांचे कल्याण महत्वाचे असते. लोकांच्या मुलभूत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देवून राजकीय पक्ष विकास कामांवर मते मागतात. मात्र, एकदा निवडून आल्यानंतर ते लोकांच्या जिवनाशी निगडीत नसलेले मुद्दे उकरून काढतात, असा अनुभव आम्हाला येत आहे.

आम्ही अठरापगड जातीच्या संघटना म्हणून समाजातील युवकांना आवाहन करतो. धार्मिक उन्मादात तुम्ही सहभागी होवू नका. आपल्या पक्षावर, नेत्यांवर प्रेम करा. मात्र, त्यांनी सांगितले म्हणून आपल्या घरादाराची रांगोळी होईल, असे कोणतेही कृत्य करु नका, अशी विनंती त्यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धध्व ठाकरे (Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या संघटनांकडून निवेदन पाठविले जाणार आहे.

social organizations
राज ठाकरे भोंग्यांचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने मांडत आहेत!

पत्रपरिषदेला डॉ. राकेश गावतुरे, डॉ. सचिन भेदे. डॉ. राजू तोटेवार, आनंदराव अंगलावर यांच्यासह बावीस संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. कुणबी समाज मंडळ, अखिल भारतीय माळी महासंघ, तैलिक महासंघ. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज, बेलदार समाज, व्हीजेएनटी वेलफेअर असोसिएशन, गाडी लोहार समाज, भोई समाज, गांडली समाज, आदिवास समाज, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र प्रदेश गोलाकर समाज, नाभिक समाज, फ्रान्सिस ख्रिस्ती समाज, गोवारी समाज, अखिल भारतीय मातंग समाज, भाट समाज, सुतार समाज, मातंग समाज, आदिवासी माना समाज, विदर्भ बारई समाज, झाडे कुणबी समाज, भावसार समाज, धोबी समाज, शिंपी समाज, कलार समाज या संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com