पोलिस चौकशीच्या ससेमिऱ्याने लतिफ खान यांचा मृत्यू, नागपुरात खळबळ...

त्यांच्या मृत्यूनंतर मोठा नागपुरातील (Nagpur) जनसमुदाय ताजबाग परिसरात जमला होता. त्यामुळे पोलिसांना (Police) मोठा बंदोबस्त लावावा लागला.
Latij Khan, Nagpur Police
Latij Khan, Nagpur PoliceSarkarnama

नागपूर ः ताजबाग परिसरातील कॉंग्रेसचे नेते लतिफ खान यांचा बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कुख्यात आरोपी आबु खानच्या बयाणावरून पोलिसांना त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला होता. त्यामुळेच तणावात येऊन त्यांना हृदय विकाराचा झटका आला, अन् त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप लतिफ खान यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे.

लतिफ खान दोन वेळा नगरसेवक पदासाठी निवडणूक लढले होते, दोन्ही वेळा थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. पण सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते. त्यांच्या मृत्यूनंतर मोठा नागपुरातील (Nagpur) जनसमुदाय ताजबाग परिसरात जमला होता. त्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त लावावा लागला. कुख्यात ड्रग्ज तस्कर (Drugs Case) आबू खानच्या बयानावरून सक्करदरा पोलिसांनी (Police) चौकशीसाठी बोलावल्याने तणावात असलेले लतीफ खान यांचा पोलिसांच्या धसक्याने मृत्यू झाल्याचा आरोप लतीफ यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

पोलिसांनी कुख्यात आरोपी आबू खान सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याने तपासादरम्यान ताजबाग परिसरातील कॉंग्रेसचे नेते लतीफ बाबू यांच्याकडून एक लाख घेतल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी लतीफ यांना चौकशीसाठी बोलावले होते. ताजबाग परिसरात आबू खान याची मोठी दहशत होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कुणीही बोलत नव्हते. या परिसरात एमडीचा मोठा व्यवसाय त्याने थाटला होता. याशिवाय विविध गुन्ह्यांतही तो सहभागी होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी मोकांतर्गत कारवाई केली होती.

फरार असताना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी भंडाऱ्यातून अटक केली. आता चौकशीदरम्यान त्याने याच परिसरात असलेले कॉंग्रेसचे नेते आणि दोनदा नगरसेवक पदासाठी उमेदवार असलेले लतीफ बाबू यांच्याकडून फरार असताना १ लाख रुपये घेतल्याचे सांगितले. त्यामुळे चार दिवसांपूर्वी त्यांना चौकशीसाठी सक्करदरा पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. यावेळी पोलिस उपायुक्त नुरुल हसनही उपस्थित होते. दरम्यान चौकशी केल्यानंतर ते घरी परतले. त्यातून बुधवारी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

Latij Khan, Nagpur Police
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

नातेवाईक आणि त्यांच्या समर्थकांकडून चौकशीदरम्यान त्यांना मारहाण करण्याचा आरोप करण्यात आल्याने तणावात येत त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत, त्यांना मारहाण करण्यात आली नसून केवळ चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रकरणामुळे ताजग परिसरात तणावपूर्ण वातावरण असल्याचे समजते.

पोलिस ठाणे परिसरात बंदोबस्त..

लतीफ बाबू यांच्या मृत्यूनंतर परिसरात जनक्षोभ उसळण्याची शक्यता गृहित धरत पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलिस ठाणे परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय प्रकरणाची माहिती वेळोवेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com