Koradi Project News: कोराडी प्रकल्प, ठाकरेंसह पर्यावरणवाद्यांचा विरोध, तर प्रहारचे समर्थन; आज जनसुनावणी !

Thermal Power Project At Koradi Near Nagpur News: बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने मात्र प्रकल्पाचे समर्थन केले आहे.
Koradi Project
Koradi ProjectSarkarnama

Nagpur News: नागपूरनजीकच्या कोराडी येथे राज्य सरकारने १३२० मेगावॅटचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. पर्यावरणवादी आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. जनमंचसारख्या संघटनांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे, तर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने मात्र प्रकल्पाचे समर्थन केले आहे. (Bachu Kadu's Prahar organization, however, has supported the project)

या प्रकल्पाबाबत आज दुपारी १२.३० वाजता प्रकल्प कार्यालय परिसरात जनसुनावणी घेण्यात येत आहे. विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोराडी वीज केंद्राच्या परिसरात जनसुनावणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदूषणामुळे जुने प्लांट बंद करून नवीन तंत्रज्ञान असलेले प्रकल्प उभारण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे प्रदूषण होणार नसल्याचा दावाही राज्य सरकारने केला आहे.

जगभरात प्रचंड प्रदूषण निर्माण करणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पांच्या विरोधात वातावरण तापत चालले आहे. काही देशांनी तर औष्णिक विद्युत प्रकल्प कायमचे हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना राज्य सरकार कोराडीत १३२० मेगावॉटचा वीज प्रकल्प प्रस्तावित करीत आहे. हे निषेधार्ह असून जनमंच या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून प्रकल्पाला विरोध केला आहे.

संपूर्ण देशात (India) जवळपास ४० हजार मेगावॉट क्षमतेचे विद्युत प्रकल्प बंद पडलेले आहेत. यातील बुटीबोरी, मिहानसह राज्यातील बरेच प्रकल्प आहेत. या प्रकल्पांना सुरू करण्याऐवजी स्थानिकांचा विरोध डावलून ११००० कोटी रुपये खर्च करून कोराडी येथेच विस्तारीकरण करण्याचा सरकारचा हट्ट का, असा सवाल जगताप यांनी केला आहे. लोकवस्तीजवळ औष्णिक विद्युत प्रकल्प नसावे, असा प्रघात असतानाही पुन्हा कोराडीत प्रकल्पाचा घाट घातला जात आहे.

Koradi Project
Nagpur Metro : मेट्रो स्टेशनसाठी खर्च झाले ४१ कोटी, पण पार्किंगसाठीचा खर्च बघाल, तर बसेल धक्का !

औष्णिक विद्युत प्रकल्पाची राख ही किरणोत्सर्गी असते. या राखेमुळे जवळपासच्या पाण्याच्या साठ्यामध्ये लेड, आर्सेनिक, मर्क्युरी, लिथियमसारखे घातक पदार्थ आढळलेले आहेत. तसेच ही राख कोलार व कन्हान नदीच्या पाण्यात मिसळल्यामुळे आजूबाजूच्या ३०-४० किलोमीटरच्या परिसरातील लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे नागपूरची (Nagpur) वाटचाल कॅन्सर कॅपिटल होण्याच्या दृष्टीने सुरू आहे.

ही वस्तुस्थिती असतानाही हा प्रकल्प रेटून धरण्याचे कारण काय? असा सवालही जगताप यांनी केला. खापरखेडा, कोराडी येथील प्रकल्पांच्या चिमणीतून निघणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी एफजीडी हे संयंत्र बसवण्याचे दिशानिर्देश दिलेले असताना ती अजूनही बसविण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Koradi Project
Nagpur District News : नगर पंचायतीला आमदार केदारांचा विरोध, खापरखेड्यात राजकारण तापले !

धुळेच्या धर्तीवर कोराडीतही निर्णय घ्या..

धुळे (Dhule) जिल्ह्यातील दोंडाई येथील ३ हजार ३०० मेगावॅटचा औष्णिक विद्युत प्रकल्प स्थानिकांच्या विरोधानंतर गुंडाळण्यात आला. आता तेथे सौरऊर्जेचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे असे कळते. त्याच धर्तीवर कोराडी येथील प्रस्तावित औष्णिक विद्युत प्रकल्पाऐवजी सौरऊर्जेवर आधारित प्रकल्प करण्यात यावा, अशी मागणी जनमंचने केली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com