किशोर जोरगेवार काल रात्री गुवाहाटीत पोहोचले, त्यानंतर रवाना झाले ‘ते’ पत्र…

काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गुवाहाटीत दाखल झालेल्या आमदारांमध्ये चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांचा समावेश आहे.
किशोर जोरगेवार काल रात्री गुवाहाटीत पोहोचले, त्यानंतर रवाना झाले ‘ते’ पत्र…
MLA Kishor Jorgewar with Eknath Shinde and other MLAsSarkarnama

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दर तासाला नव्या घडामोडी होत आहेत. सत्तांतर होणार की नाही, झाले तर मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण, या प्रश्‍नांची उत्तरं शोधली जात आहेत. अशात काल रात्री पुन्हा दोन अपक्ष आमदार गुवाहाटीत दाखल झाले.

काल रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गुवाहाटीत (Guwahati) दाखल झालेल्या आमदारांमध्ये चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांचा समावेश आहे. या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांच्या दोन तृतीआंश आकड्याची लढाई जिंकलेली आहे. शिवसेनेचे (Shivsena) ३७ पेक्षा जास्त आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे आणि अपक्ष अशा सर्व आमदारांच्या सहीचे पत्र काल रात्रीच राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

गुवाहाटी येथील आलिशान रॅडीसन ब्लू हॉटेलमध्येच काल एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली. यामध्ये आमचा गट वेगळा आणि आमचे गटनेते एकनाथ शिंदे, असे सर्व आमदारांनी एकमुखाने सांगितले. तसा व्हिडिओसुद्धा समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकरणात रोजच वेगवान घडामोडी होत आहेत. काल रात्री दोन आमदार गुवाहाटीत पोहोचल्यानंतर आजही काही आमदार पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पण आता शिंदे यांचा गट अधिक वेळ गुवाहाटीत घालवणार नाही. कारण त्यांनी काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे.

MLA Kishor Jorgewar with Eknath Shinde and other MLAs
गुवाहाटीत घुमला शिवसेनेचा आवाज; 42 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन

एकनाथ शिंदे गटाला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मुंबईला विधानसभेत यावेच लागणार आहे. त्यांमुळे सर्व आमदारांना मुंबईला हालवावे लागणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड न झाल्याने आता उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सर्व जबाबदारी आहे. त्यांना ही प्रक्रिया करावी लागणार आहे. एकनाथ शिंदे यांचा गट आता शिवसेना पक्षावर दावा करू शकतात. त्यांनी उपाध्यक्षांसमोर येऊन सांगितल्यास महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार आहे. त्यामुळेच सोमवारी रात्री सुरू झालेल्या बंडखोरीच्या या नाट्यात आजचा दिवस फार महत्वाचा ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in