Kishor Jorewar : समस्या डोंगरायेवढी अणि मंत्री महोदयांचे उत्तर मात्र उंदरायेवढे...

Chandrapur : पाणी नाही म्हणून चार दिवस मोतिबिंदुची शस्त्रक्रिया पुढे ढकलली गेली.
Kishor Jorgewar
Kishor JorgewarSarkarnama

Issue of Government Medical College, Chandrapur : चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे समस्यांचे डोंगर आहे. येथील समस्या डोंगरायेवढी आणि मंत्री महोदयांचे उत्तर मात्र उदरायेवढे, असे म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी लक्षवेधीवर बोलण्यास सुरवात केली.

पाणी नाही म्हणून चार दिवस मोतिबिंदुची शस्त्रक्रिया पुढे ढकलली गेली. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणार आहात का, असा प्रश्न आज अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला. येथील समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्याची मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची दुरवस्था लपलेली नाही. आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर रुग्णालयाची पाहणी केली असता. पाणी नसल्याने मोतिबिंदुवरील शस्त्रक्रिया चार दिवस पूढे ढकलली गेल्याचा संतपाजनक प्रकार समोर आला होता. हाच विषय आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उचलुन धरला. यावर लक्षवेधी उपस्थित केली.

हा प्रकार अतिषय गंभीर कार्यवाही करणार आहात का, असा प्रश्न यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला. सोबतच सदर महाविद्यालयात काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कंत्राट संपला. मात्र या कंत्राटाराला मुदतवाढ न मिळाल्याने या 336 कर्मचाऱ्यांचा मागील पाच महिण्यांचा पगार थकीत आहे.

Kishor Jorgewar
Chandrapur News: जिल्हा बॅंकेची नोकर भरती पुन्हा अडचणीत, संचालक मंंडळाला जबर धक्का...

कंत्राटदाराला मुदत वाढ देऊन तात्काळ त्यांचे वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देतांना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी सदर कंत्राट वाढवून दोन ते तिन दिवसांत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले जाईल, असे सांगीतले आहे. येथील कर्मचा-र्यांनी डेरा आंदोलन सुरु केले आहे.

या कर्मचा-र्यांच्या वेतनासाठी 10 कोटी 50 लक्ष रुपयांची गरज असतांना आपण केवळ दिड कोटी रुपये दिले आहे. यातीलही केवळ 90 लक्ष रुपयेच प्राप्त झाले असल्याचे यावेळी त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणुन दिले. आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आमदार नाना पटोले, (Nana Patole) आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बोलतांना उपस्थित केलेला प्रश्न योग्य असल्याचे सांगत सदर महाविद्यालयाच्या औषध साठ्याचा अभाव व इतर गैरसोयीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com