Kirtikumar Bhangdiya : मोठी बातमी! भाजप आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल!

Kirtikumar Bhangdiya : महिलेला मारहाण केल्याचा आरोप...
Kirtikumar Bhangdiya : BJP
Kirtikumar Bhangdiya : BJPSarkarnama

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया (Kirtikumar Bhangdiya MLA Of BJP) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या भाऊ व त्यांच्या पत्नीलावर हल्ला करण्यात आला, मारहाण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात मारहाण झालेल्या महिलेने आमदार भांगडीया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पिडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पिडीत महिला या पती साईनाथ बुटकेसह चिमूर या ठिकाणी राहतात.

Kirtikumar Bhangdiya : BJP
Jalgaon District Bank : आमचाच एक गद्दार झाला; अन्यथा पराभव अशक्य होता : खडसेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

साईनाथ यांचा मोठा भाऊ गजानन बुटके हे काँग्रेस पक्ष चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. ११ तारखेच्या दिवशी सायंकळी सात-साडेसातच्या सुमारास भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन बुटके यांच्या घराबाहेर आले. बुटके यांना शिवीगाळ केली. बुटतकेंच्या घराच्या आत जबरदस्तीने शिरले. साईनाथ यांना मारहाण केली. मारहाण करतच त्यांना घराबाहेर ओढून आणले. या मारहाणीला विरोध करताना, त्यांचा विनयभंग केला गेला, असा आरोपपिडीत महिलेने केला आहे.

११ तारखेला सायंकाळी साडे सातच्या सुमारास भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह बुटके यांच्या घराच्या बाहेर आले. त्यांनी बुटके यांना शिवीगाळ करून त्यांच्या घरात जबरदस्तीने शिरले आणि साईनाथ यांना मारहाण करत बाहेर घेऊन आले. या मारहाणीला विरोध केला असता, त्यांचा विनयभंग केला आणि मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

Kirtikumar Bhangdiya : BJP
Imtiaz Jalil News : मुशायरा, कव्वालीच्या कार्यक्रमात गर्दी करणारे आंदोलनात का येत नाहीत ?

यासोबतच, आमदार भांगडिया यांच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिला, साईनाथ आणि त्यांच्या दोन्ही लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली, असे पिडीताने म्हंटले आहे. काँग्रेसचे पदाधिकारी असलेले गजानन बुटके ही यावेळी घटनास्थळी दाखल झाले असता, गजानन यांना ही रोखण्याचा भांगडीयांना प्रयत्न केला. त्यांना देखील भांगडीया यांनी मारहाण केली, असंही दाखल केलेत्या तक्रारीत म्हंटले गेले आहे.

पिडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासह, त्यांच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरूद्ध कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com