Khaire : अमित शाह यांच्यावर थेट आरोप करत खैरे म्हणाले ते ईव्हिएम नियंत्रित करतात !

Amit Shaha : त्यांनी जी माणसं नेमलेली आहेत, त्यांतील एकाने मला ही माहिती दिली आहे.
Chandrakant khaire, Hansaraj Ahir and Amit Shaha.
Chandrakant khaire, Hansaraj Ahir and Amit Shaha.Sarkarnama

Chandrakant Khaire on Amit Shaha : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार शिवगर्जना अभियानासाठी सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल ते गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गडचिरोलीमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले. चंद्रपुरात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना भेटल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला होता.

अमित शहा ईव्हीएम नियंत्रित करतात, यासाठी ते उपग्रहाचा वापर करतात. याकामी त्यांनी जी माणसं नेमलेली आहेत, त्यांतील एकाने मला ही माहिती दिली आहे. असे खैरेंनी काल गडचिरोली दौऱ्यावर असताना सांगितले. याशिवाय माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पराभवाला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जबाबदार आहेत, हा दुसरा खळबळजनक आरोप खैरेंनी केला. पण मुनगंटीवारांच्या आरोपाचे पुरावे नाही, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत आणि त्यांना ईव्हीएमचा मोठा आधार आहे. त्या जोरावरच ते वाट्टेल तसे वागत आहेत. वाट्टेल ते निर्णय देशावर लादत आहेत. एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपातीपणाचा आहे. भाजप शासकीय यंत्रणांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करीत आहे. जे विकले जात नाही, त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावून तुरुंगात डांबण्याचे पाप भाजप करीत असल्याचेही चंद्रकांत खैरे म्हणाले.

देशासमोर असलेले महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यांसारख्या मुद्यांवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी रोज नवनवीन मुद्दे पुढे केले जात आहेत. एकदा का मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या, की त्यांना त्यांची जागा कळणार आहे. त्यामुळेच ते ईव्हीएमचा पुरस्कार करतात आणि मतपत्रिकेवर मतदान घेण्यास विरोध करतात. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे मतदान मतपत्रिकेवर झाले. या निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधरांनी त्यांना साफ नाकारले. त्यामुळेच सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेवर घ्यावा, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.

Chandrakant khaire, Hansaraj Ahir and Amit Shaha.
Chandrakant Khaire News : भाजपला गडकरींची अडचण, म्हणून त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न..

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आज यवतमाळ (Yavatmal) आणि वणीच्या दौऱ्यावर आहेत. उद्या २ मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा आणि उमरखेड येथे. तर ३ मार्च रोजी वाशीम (Washim) जिल्ह्यातील कारंजा, रिसोड आणि वाशीम येथे त्यांचे मेळावे आणि बैठका आहेत. एकंदरीतच विदर्भात त्यांची शिवगर्जना जोरात सुरू आहे. या दोऱ्यात त्यांना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याशिवाय अद्याप त्यांना कुणीही प्रत्युत्तर दिलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in