Kedar : केदारांचा नकार होता, पण थेट अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी केला कॉल; अन् मग...

यावेळी जिल्हा परिषदेत चारही सभापती कॉंग्रेसचेच बसवायचे, या निर्धाराने कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी रणनीती आखली होती. राष्ट्रवादीच्या सदस्याला सभापतिपद देण्याच्या मुडमध्ये केदार नव्हते.
Supriya Sule, Sunil Kedar and Ajit Pawar
Supriya Sule, Sunil Kedar and Ajit Pawarsarkarnama

नागपूर : जिल्हा परिषदेच्या चार सभापतिपदांची निवडणूक काल पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेत चारही सभापती कॉंग्रेसचेच बसवायचे, या निर्धाराने कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी रणनीती आखली होती. राष्ट्रवादीच्या सदस्याला सभापतिपद देण्याच्या मुडमध्ये केदार नव्हते. मग ही बाब स्थानिक नेत्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कानावर घातली. दोन्ही नेत्यांनी केदारांना कॉल केला. त्यानंतर केदारांचा नाइलाज झाला.

जिल्हा परिषदेत (ZP) काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली तरी सभापतिपद देण्यास काँग्रेसकडून (Congress) सातत्याने नकार दिला जात होता. म्हणून स्थानिक नेत्यांनी ‘पवार’ कार्ड वापरले आणि त्याचा त्यांना फायदा झाला. सुप्रिया सुळेंचा (MP Supriya Sule) फोन आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) बाळू जोध यांचे नाव सभापतिपदासाठी जाहीर करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीने ही निवडणूक जिंकली.

जिल्हा परिषदेच्या चार सभापतिपदांसाठी काल निवडणूक झाली. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व सदस्य एकाच ठिकाणी होते. काँग्रेसने सभापतिपदासाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, राष्ट्रवादीकडून वेगवेगळ्या नावांचे प्रस्ताव येत होते. त्यावर कोणाचेच एकमत होत नव्हते. सुनील केदार शेकापचे समीर उमप यांच्या नावासाठी आग्रही होते. त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा मिळाली होती. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा यास विरोध होता. जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी बाळू जोध यांचे नाव रेटून धरले.

Supriya Sule, Sunil Kedar and Ajit Pawar
Supriya Sule : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुप्रिया सुळे उतरल्या रस्त्यावर

स्थानिक नेते देशमुख गटाला डावलत असल्याने सुप्रिया सुळे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कानावर ही बाब टाकण्यात आली. पवार आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी फोनवरून सुनील केदार यांच्याशी संपर्क साधला. देशमुख गटाच्या उमेदवाराला सभापतिपद देण्याची सूचना केली. पवार कुटुंबातूनच फोन आल्याने देशमुख गटाच्या उमेदवाराला विरोध करणाऱ्यांचा नाइलाज झाला. सर्वांनी यावर चर्चा बंद करून बाळू जोध यांच्यावर शिक्कामोर्तब केले.

विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपाध्यक्षपद देण्याची मागणी केली होती. मात्र, ती केदारांनी फेटाळून लावली होती. त्यानंतर सभापतिपदही देण्यास नकार दिला होता. यावेळीसुद्धा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी उपाध्यक्षपद देण्याची विनंती केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही कळविले होते. केदारांनी निवडणुकीच्या वेळी बघू, अशी भूमिका घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in