काश्‍मीर फाईल असत्य, झुंडचे वास्तव लोकांपर्यंत पोहोचवा...

काश्मीर फाईल्स हा असत्यावर आधारित असल्यामुळे तो टॅक्स फ्री करण्याची मागणी केली जात आहे. मात्र झुंड हा चित्रपट सत्यावर आधारित आहे. त्यामुळे त्याला टॅक्स फ्री करण्याची गरज नाही, असे पटोले (Nana Patole) म्हणाले.
Nana Patole's statement on Tha Kashmir files movie,  Nana Patole on The Kashmir Files Movie, Nana Patole News
Nana Patole's statement on Tha Kashmir files movie, Nana Patole on The Kashmir Files Movie, Nana Patole News Sarkarnama

नागपूर : केंद्र सरकार प्रचार करीत असलेला काश्‍मीर फाईल हा चित्रपट असत्यावर आधारित आहे, तर महानायक अमिताभ बच्चनची भूमिका असलेला आणि प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असलेला झुंड हा चित्रपट सत्यावर आधारीत आहे. त्यामुळे झुंडमधील वास्तव लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. (Nana Patole on The Kashmir Files Movie)

झुंड या चित्रपटाचे वास्तविक नायक व काँग्रेसचे पदाधिकारी विजय बारसे यांचा नागपूर (Nagpur) शहर काँग्रेस (Congress) कमिटीच्यावतीने नाना पटोले (Nana Patole) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देवडिया भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाला माजी खासदार विलास मुत्तेमवार, शहरअध्यक्ष आमदार विकास ठाकरे, (Vikas Thakre) शेख हुसेन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नाना पटोले काश्मीर फाईल्स (Kashmir files) हा असत्यावर आधारित असल्यामुळे तो टॅक्स फ्री करण्याची मागणी केली जात आहे. मात्र झुंड हा चित्रपट सत्यावर आधारित आहे. त्यामुळे त्याला टॅक्स फ्री करण्याची गरज नाही, असे पटोले म्हणाले.

विजय बारसे कॉंग्रेसमधील हिरा..

काश्मीर फाईल्स चित्रपटातून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करण्यात आले आहे आणि केंद्र सरकार त्याचा प्रचार करत असल्याची टीकाही त्यांनी केली. याविरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून खरे सत्य काय आहे हे सांगण्याची गरज आहे. काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे की सर्व धर्माबद्दल आदर ठेवतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. देश विकून चालविणाऱ्यांच्या विरोधात लढा द्यायचा आहे, असेही पटोले म्हणाले. यावेळी विलास मुत्तेमवार यांनी विजय बारसे यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करत मृदुभाषी असलेला हा काँग्रेसमधील हिरा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास ठाकरे यांनी तर संचालन गजराज हटेवार यांनी केले.

Nana Patole's statement on Tha Kashmir files movie,  Nana Patole on The Kashmir Files Movie, Nana Patole News
Video: "सोनियांना मविआत यायचं नव्हतं", नाना पटोले

विजय बारसे खरे महानायक..

झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब मुलांना एकत्र आणून त्यांना घडविले. त्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या जीवनावर नागराज मंजुळे यांनी झुंड हा चित्रपट तयार केला. त्यात अमिताभ बच्चन यांनी विजय बारसे यांची भूमिका केली आहे. मात्र खऱ्या अर्थाने विजय बारसे हे खरे महानायक आहे. या महानायकाचा सत्कार काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com