कालीचरणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

कालीचरणने (Kalicharan Maharaj) महात्मा गांधींबद्दल (mahatma gandhi) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या.
Kalicharan
Kalicharan

वर्धा : महात्मा गांधींबद्दल (mahatma gandhi) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण (kalaicharan maharaj) पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र वर्धा न्यायालयाने त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे बजरंग दलाचे कार्यकर्ते कोर्टासमोर उभे आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते ही निषेध व्यक्त करत आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून येत आहे.

दरम्यान आज पून्हा कालीचरणने वादग्रस्त विधान केल्याची माहितीही समोर आली आहे. सेवाग्राम येथून पोलिसांच्या वाहनातून त्यांना न्यायालयात नेत असताना त्याने ‘जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीये’चा दिला नारा दिल्याची माहितीही समोर आली आहे. वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, " न्यायालयाने कालीचरण 14 न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कालीचरणचे वकील विशाल टिबडीवाल यांनी त्यांच्या वतीने जामीन अर्ज दाखल करणार सीन त्यासाठी प्रक्रिया त्यांनी प्रक्रीयाही सुरू केल्याची माहिती दिली आहे. सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

Kalicharan
महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान ; कालीचरण बाबाला अटक

तर दूसरीकडे वर्ध्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनीही याबाबत आपली भूमिका मांडली आहे. कालीचरण महाराजांनी महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्ह शब्दांत टीप्पणी केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने कालीचरणविरोधात शहर ठाण्यात दाखल तक्रार दाखल करण्यात आली होती. आमच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली त्यांचे अभिनंदन केले आहे.

अकोल्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास इन्कार केल्याने पदाधिकाऱ्यांनी ठाण्यासमोरच ठिय्या दिल्यानंतर अखेर साडे चार तासानंतर पोलिसांनी या अर्जाची दाखल घेऊन कालीचरण महाराजांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील ‘धर्म संसद’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते. यावेळी वक्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि नथुराम गोडसेचे कौतुक केलं. या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या अकोल्याचे रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज यांनीही महात्मा गांधींविषयी अपशब्द वापरले असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com