NCP Hasan Mushrif ED Raid : मुश्रीफांचे खंदे समर्थकही ED च्या रडारवर

NCP Former Mayor Prakash Gadekar ED Raid : प्रकाश गाडेकर व हसन मुश्रीफ यांच्या घरात चौकशी करण्याचे काम ईडीचे अधिकारी सध्या करीत आहेत.
Hasan Mushrif ED Raid News update
Hasan Mushrif ED Raid News updatesarkarnama

NCP Former Mayor Prakash Gadekar ED Raid : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ed) पथकाने आज (बुधवारी) पहाटे 6 वाजताच छापेमारीस सुरवात केली आहे. (Hasan Mushrif ED Raid News update)

त्यांच्या कागल व पुण्यातील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. कागल येथील त्यांचे खंदे समर्थक कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर (Prakash Gadekar)यांच्या घरावर सकाळी ७ च्या सुमारास ईडीने छापा टाकला आहे.

हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीसह आयकर विभागानेही छापा टाकला आहे. ईडीचा छापा पडला त्यावेळी आमदार मुश्रीफ हे घरी नव्हते, छापा पडला त्यावेळी मुश्रीफ यांच्या घरी त्यांची पत्नी व साजिद,अबिद व नवीद ही तिन्ही मुले , सुना, नातवंडे घरी होते. हसन मुश्रीफ हे कालच सायंकाळीच मुंबईला गेले आहेत.

मुश्रीफ व गाडेकर यांच्या घरावरील छाप्यानंतर मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर जमले असून भाजपचा निषेध करीत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा दिल्या. (Hasan Mushrif ED Raid News update)

Hasan Mushrif ED Raid News update
ACB News : ठेकेदाराकडे 20 हजाराची लाच मागणाऱ्या सरपंच ACB च्या ताब्यात

मुश्रीफ यांच्यावर पडलेल्या छाप्यानंतर मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी येथील गैबी चौकात येऊन निदर्शने केली. भाजपचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली . त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचबरोबर प्रकाश गाडेकर यांच्या घराबाहेरही कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. प्रकाश गाडेकर व हसन मुश्रीफ यांच्या घरात चौकशी करण्याचे काम ईडीचे अधिकारी सध्या करीत आहेत.

हसन मुश्रीफ म्हणाले, "यापूर्वीही तपास यंत्रणांनी माझी चौकशी केली आहे. मी त्यांना सर्व माहिती दिली आहे. आता पुन्हा कशासाठी छापे टाकले, हे समजत नाही. मला नाऊमेद करण्यासाठी हे सारे सुरु असून गलिच्छ राजकारण सुरु आहे. माझे सहकारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत आहेत," 'कार्यकर्त्यांनी शांत राहावे," असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे. अस्लम शेख व माझ्यासारख्या विशिष्ट समाजातील लोकांवर कारवाई केली जात आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif ED Raid News update
Hasan Mushrif ED Raid : छापेमारीनंतर हसन मुश्रीफांचा एकच सवाल ; म्हणाले,'पुन्हा कशासाठी.."

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आज ईडीने छापे टाकले आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ईडी अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

अब्रुनुकसानीचा दावा करणार

किरीट सोमय्या यांनीच या कारखान्यात हसन मुश्रीफांनी आपल्या जावयासोबत मिळून तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. हसन मुश्रीफ यांनी हे आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. तसेच, असे आरोप केल्यामुळे किरीट सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावाही करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com