जनतेशी नाळ तुटल्यानेच काँग्रेसचा पराभव नेत्याने दिली कबुली!

भाजप व आरएसएस राहुल गांधी यांना घाबरते म्हणून ते सातत्याने त्यांच्या बदनामीची मोहीम चालवतात.
K.C. Venugopal
K.C. Venugopalsarkarnama

वर्धा : काँग्रेस समजून घेतली आणि काँग्रेसचा (Congress) विचार शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवला, तळागाळातील लोकांशी नाळ तुटू दिली नाही तर आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही. भारतीय जनता पक्ष (BJP) सरकार चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महागाई गगनाला भिडली असून लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागरण करा. देशात धर्माच्या नावाने विभाजनाचे काम सत्ताधा-यांकडून सुरु आहे. भाजपच्या सत्ताकाळात 'आयडिया ऑफ इंडिया' धोक्यात आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (K.C. Venugopal) यांनी केंद्र सरकारवर केली.

सेवाग्राम येथे प्रशिक्षण शिबीराच्या समारोपीय भाषणात वेणुगोपाल बोलत होते. ते म्हणाले की जो मार्ग आम्ही भारतासाठी तयार केला त्यावर चालणे आपणच बंद केले आहे. आपल्या पूर्वजांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वातंत्र्याची लढाई लढली नाही. आपण कोण आहोत याचा आपल्याला विसर पडला आहे. सेवाग्राम या नावातच लोकांची सेवा आहे. लोकांशी नाळ तुटल्याने निवडणुकीत पराभव होत आहे. त्यासाठी बुथ स्तरावर संघटन मजबूत करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. झोकून देऊन काम केल्याशिवाय पक्ष संघटन वाढणार नाही. समता, बंधुता हा काँग्रेसचा विचार आहे. तो विचार लोकापर्यंत पोहचवा. भाजप व आरएसएस राहुल गांधी यांना घाबरते म्हणून ते सातत्याने त्यांच्या बदनामीची मोहीम चालवतात. त्यांना माहिती आहे राहुल गांधी हे काँग्रेसची ताकद आहेत. नेहरू-गांधी कुटुंबाने कधीही जाती-धर्माच्या नावावर भेदभाव केला नाही, सर्वांना समान सन्मान दिला, असेही वेणुगोपाल म्हणाले.

K.C. Venugopal
...हा तर पद्मश्री मिळविण्यासाठी विक्रम गोखलेंचा केविलवाणा प्रयत्न !

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नेतृत्व तयार करणे, नेतृत्व आणि जनता यामधील दरी भरून काढण्याचे काम होणार आहे. काँग्रेस संघटना पुन्हा मजबूत करण्यात असे प्रशिक्षण कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावणार आहेत. प्रशिक्षण विभाग पक्षाचा महत्वाचा विभाग राहणार आहे. प्रशिक्षणाची कार्यस्वरूपी आणि अनिवार्य व्यवस्था पक्षाने तयार करण्याचे ठरवले आहे. या प्रशिक्षणातून देशातील विविधता प्रशिक्षणार्थींना समजून घेता आले. सेवाग्राम मधील हे चार दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असतील. डिसेंबरमध्ये प्रदेश पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम होईल तर जानेवारीत जिल्हा स्तरीय व फेब्रुवारीत तालुका पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम होणार असल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली.

आपण सर्व नशीबवान आहात की महात्मा गांधी जिथे राहिले त्या भूमित राहून तुम्हाला त्यांचे विचार जगता आले. प्रभात फेरीत सर्व जातीधर्म भेदभाव विसरून लोक एकत्र येतात आता पुन्हा एकदा प्रभातफेरीचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. मानवी गरजांसोबतच मानवी हक्कांची लढाई महत्त्वाची आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज रहावे.

K.C. Venugopal
भाजप नेत्याकडून अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी पैसे वाटप

या वेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्याचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप व आरएसएसकडे इतिहास ही नाही आणि भविष्यही नाही. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व सचिन राव, वर्ध्याचे पालक मंत्री सुनिल केदार, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेसचे सचिव वामशी रेड्डी, बी. एम. संदीप, राष्ट्रीय सचिव आणि पंजाबचे सह प्रभारी हर्षवर्धन सपकाळ, आशिष दुआ, प्रवक्ते अतुल लोंढे, वर्धा जिल्हाचे काँग्रेसचे अध्यक्ष मनोज चांदूरकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in