ज्वाला धोटेंना पोलिसांनी रोखले; राज्य अन् केंद्र सरकारवर केले गंभीर आरोप…

नागपुरात (Nagpur) पोलिस (Police) प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यासाठी अजगरासारखं सुस्त पडलेलं अपयशी महाविकास आघाडी सरकार आणि त्यांचा गृहविभाग जबाबदार असल्याचे ज्वाला धोटे म्हणाले.
Jwala Dhote on Nagpur Police.
Jwala Dhote on Nagpur Police.Sarkarnama

नागपूर : शहरातील गंगा जमुना या वारांगनांच्या वस्तीतील महिलांच्या प्रश्‍नासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांना पोलिसांना रोखले. भाजपच्या नेत्यांनी कालच सीपींना निवेदन दिले. येवढेच नव्हे तर सीपींच्या कार्यालयातच भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदही घेतली. त्यामुळे भाजप नेत्यांचे निवेदन स्वीकारणाऱ्या सीपींनी आम्हाला का रोखले, असा संतप्त सवाल धोटे यांनी केला आहे.

नागपुरात (Nagpur) पोलिस (Police) प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यासाठी अजगरासारखं सुस्त पडलेलं अपयशी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि त्यांचा गृहविभाग जबाबदार आहे. सोबतच केंद्रीय मंत्र्यांच्या भरवशावर असलेला विरोधी पक्ष काल तर पोलिस आयुक्तांच्या (Police Commissioner) कार्यालयात भाजपचे नेते निवेदन द्यायला आले आणि त्यांचे निवेदन घ्यायला आयुक्त कॉन्फरन्स हॉलमध्ये आले. तेथेच भाजप नेत्यांची पत्रकार परिषद झाली आणि या परिषदेला आयुक्तसुद्धा सुरुवातीचा काही वेळ उपस्थित होते. नंतर त्यांच्या कक्षात गेले. नागपूरच्या इतिहासात हे बहुधा पहिल्यांदा घडले असावे, असेही धोटे म्हणाल्या.

राजकीय नेते असेच पत्रकार परिषदा घ्यायला लागले, तर प्रेस क्लब आणि पत्रकार भवनला लवकरच टाळे लावावे लागेल. प्रशासकीय इमारतीमध्ये राजकीय लोक किंवा सामाजिक संघटना पत्रकार परिषद घेऊ शकत नाही. काल भाजपच्या नेत्यांनी कायद्याचे सर्रास उल्लंघन केले. यामध्ये जे लोक दोषी आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली.

Jwala Dhote on Nagpur Police.
पोलिस अधीक्षकांना दोषी धरत जमादाराची आत्महत्या; पोलिस दलात खळबळ...

राजकीय नेत्यांना थेट प्रवेश आणि महिलांचे प्रश्‍न घेऊन आलेल्या महिलेला पोलिस आयुक्त कार्यालयात येण्यापासून रोखण्यासाठी शेकडो पोलिस तैनात केले जातात, हे कशाचे लक्षण मानावे, असा प्रश्‍न करीत कालच्या पत्रकार परिषदेला दोषी असलेल्यांवर दोन दिवसांत कारवाई झाली नाही, तर सोमवारपासून पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in