Kishor Jorgewar News: आमदार जोरगेवार म्हणाले; वाघच आम्हाला भेटायला गावात येतात, कारण...

Chandrapur : वन्यप्राण्यांच्या मानवी वस्तींवर हल्ल्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
MLA Kishor Jorgewar
MLA Kishor JorgewarSarkarnama

Mumbai Legislative Assembly News : चंद्रपूरातील जंगल आणि जंगली प्राण्यांचे संगोपन करणारे आम्ही आहोत. मात्र ताडोबा सफारीच्या वाढलेल्या दरांमुळे आम्हाला वाघ पाहायला ताडोब्यात जाता येत नाही. कदाचित त्यामुळे कधी कधी वाघच आम्हाला भेटण्यासाठी गावात येतात, असे म्हणत आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील दरवाढीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. (The attention of the House was drawn to many topics)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाढलेल्या दरांकडे आणि वन्यप्राण्यांच्या मानवी वस्तींवर हल्ल्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधत ताडोबा सफारीकरिता चंद्रपूरकरांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मतदारसंघातील अनेक विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागाचे काम एकाच तहसील कार्यालयाच्या माध्यमातून चालत असल्याने येथे अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

विविध योजनांचे प्रमाणपत्र, फेरफार प्रकरणे, नझूल जागेबाबत प्रश्न, सातबारा उतारा, फेरफार, तक्रारीच्या सुनावण्या, जुने रेकॉर्ड सांभाळणे ही सर्व कामे प्रभावित होत आहें. त्यामुळे साधरणतः चार लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, तसेच घुग्घूस व लगतच्या गावांसाठी अपर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली आहे.

अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चेसाठी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. चंद्रपूर हे ५०० वर्ष जून शहर आहे. असे असताना अजूनही येथील अनेक भूखंड हे लीज लॅन्ड म्हणून येथे ३० वर्षाची लीज दिली जायची. नंतर ती लीज नूतनीकरण केल्या जायची. मात्र शासनाने पाच टक्के रक्कम भरत त्या जागा स्वमालकीच्या करण्याचा निर्णय केला. मात्र ही प्रक्रिया अतिशय कासवगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना त्या जागेचा नकाशा मंजूर करता येत नाही. त्यामुळे विशेष बाब अंतर्गत प्रशासनाने हा प्रश्न मार्गी काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

MLA Kishor Jorgewar
Jorgewar : आमदार जोरगेवारांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिला ‘हा’ शब्द !

घुग्घूस नगर परिषद येथे स्टेडियम निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी जागा मोजणीचे ९४ हजार रुपयेही भरण्यात आले आहेत. येथे उत्तम स्टेडियम तयार करण्यासाठी सदर जागा तात्काळ घुग्घूस नगर पालिकेला हस्तांतरित करावी. चंद्रपूर येथे अनेक ले-आउट पडले आहे. येथे एका प्लॉटची मोजणी करायची असेल तर ती करता येत नाही. त्यामुळे संपूर्ण ले-आऊटची मोजणी करावी लागते आणि त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे महसूल मंत्र्यांनी पुढाकार घेत संपूर्ण ले-आउट ची मोजणी न करता केवळ एका प्लॉटची मोजणी करता येईल, असे नियम करावे.

MLA Kishor Jorgewar
Jorgewar : सुरजागडचे लोहखनिज विदर्भाबाहेर विकण्यास सरकार बंदी घालणार ?

तुकडेबंदी कायद्यामुळे नागरिकांनी बांधलेल्या घरांची मोजणी करता येत नाही. त्याची विक्री होत नाही. त्यामुळे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लाखो करोड रुपयांचे व्यवहार केले जात आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता महानगर पालिका, नगर पालिका क्षेत्रात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्यात यावा, येत्या काळात होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी अव्वल कारकून यांना पदोन्नती देत नायब तहसीलदारांची रिक्त असलेली १०० ते ११५ पदे भरण्यात यावी.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी करिता चंद्रपूरकरांना सवलत देण्यात यावी, मागच्या सरकारने १७१ हेक्टर जागेमध्ये २८६ कोटीची टायगर सफारी आणि वन्यजीव रेस्क्यू सेंटरची घोषणा केली होती. या टायगर सफारीचे काम लवकर सुरू करण्यात यावे, वन हक्क दाव्यांकडे लक्ष देण्यात यावे, ताडोबामध्ये असलेल्या प्रत्येक वाघाचा पक्ष्याचा वेगळा इतिहास आहे. पहिले येथे मृत पावलेल्या प्राण्यांचे पक्षांचे अस्तित्व साबुत ठेवत त्यांची प्रतिकृती येथे बनविल्या जात होती. मात्र आता ते बंद झाले आहे. ते पुन्हा एकदा सुरू करत एक सुंदर असे संग्रहालय येथे सुरू करण्यात यावे.

MLA Kishor Jorgewar
Krishna Janmabhoomi case: कृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह; युक्तीवाद पूर्ण, 'या' दिवशी होणार अंतिम फैसला

चंद्रपूरमधील रामबागमध्ये असलेल्या जागेत पांरपारिक खेळांचे क्रीडांगण तयार करण्यात यावे, कापसाच्या १२००च्या वर बियाणांचे वाण आहे. एवढे वाण असतानासुध्दा उत्पादकता केवळ ४२ टक्केच आहे. त्यामुळे मातीच परीक्षण करत पाच किंवा १० वाण कृषी विभागाने घोषित करावे, कृषी सहायकांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जागा उपलब्ध करून द्यावी, चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी (Collector) कार्यालय निर्माण होत आहे.

उर्वरित निधी देत या कार्यालयाचे काम पूर्ण करावे, अधिकारी आणि कर्मचा-यांकरिता १५ कोटी रुपयांचा निधी द्यावा, विदर्भातील पंढरपूर (Pandharpur) म्हणून ओळखल्या जाणा-या वढा तीर्थक्षेत्र येथे जाणारा मार्ग मोठा करून येथे छोट्या पुलाची निर्मिती करण्यासाठी निधी द्यावा, विचोडा आणि म्हातारदेवी येथे छोटे पुल आणि रस्त्याची निर्मिती करावी, या मागण्या आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com