Jayant Patil News : दादांना सर्व रस्ते माहिती आहेत, पण ते चुकीच्या गल्लीत घुसतात !

Chandrakant Patil : दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझ्या बैठका झाल्या.
Jayant Patil and Chandrakant Patil
Jayant Patil and Chandrakant PatilSarkarnama

Maharashtra Legislative Council News : अलिबाग ते रोहा या रस्त्याचे काम अद्यापही रखडले आहे. आज सभागृहात हा प्रश्‍न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील बांधकाम मंत्री असताना हा रस्ता मंजूर झाला होता. मी दादांना खास त्यासाठी नेले होते. तेव्हापासून हा रस्ता रखडला आहे. हा प्रश्‍न जयंत पाटील यांनी आज सभागृहात उपस्थित केला.

यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले, यापूर्वी तीन वेळा या रस्त्यासाठी टेंडर काढले. पहिले एकच आले. मग दोन आली. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझ्या बैठका झाल्या. मग तिसरं टेंडर भरलं अन् शेवटी काम फायनल झालं. तो गुजरातचा माणूस होता. रोहा - अलिबाग हा रस्ता कोणी सुरू केला. मागणी कुणी केली, याची माहिती नसताना दोन लोकांमध्ये त्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली आहे. हा प्रकार थांबवा आणि अलीबागकरांचा खेळ थांबवा.

आता या रस्त्याच्या कामाचे रिटेंडरींग करा. २३८ कोटी रुपये मंजूर करून दादांनी त्यावेळी रस्ता मंजूर केला होता. टेंडर १८० कोटीचे आले. दादा म्हणाले पैसे वाचत आहेत आणि काम सुरू झाले. पण नंतर ठेकेदाराने काम अर्धवट सोडले. १३ कोटी रुपये त्या कामासाठी अग्रिम दिले होते. कोण ५ कोटी मागतो, कुणी २५ कोटी मागतो म्हणून तो ठेकेदार पळून गेला.

आता उसरला नवीन इंडस्ट्री होते आहे. त्यासाठी हा रस्ता फार महत्वाचा आहे. त्यामुळे आता नवीन ठेकेदाराला काम द्या, अशी मागणी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. चंद्रकांत दादांना (Chandrakant Patil) रायगड जिल्ह्यातले सर्व रस्ते माहिती आहेत. पण ते चुकीच्या गल्लीत घुसतात, अशी कोपरखळी जयंत पाटलांनी मारली अन् सभागृहात हशा पिकला.

Jayant Patil and Chandrakant Patil
शेकाप, स्वाभिमानीचेही सरकार स्थापनेत मोठे योगदान : जयंत पाटील  

या रस्त्याच्या कामासाठी निधीची उपलब्धता मोठी गोष्ट होती. काम का थांबले, हे तपासणे गरजेचे आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशी या कामाला सुरुवात झाली आहे. मी नारळ फोडायला गेलो नाही. नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम झाले पाहिजे. जर कुणी आडकाठी आणली तर कायदेशीर कारवाई सरकार म्हणून जी करायला पाहिजे, ती मी करेन, असे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com