नागपुरमध्ये पक्षाला मोठी संधी; जयंत पाटलांचे सूचक विधान

जयंत पाटील यांनी नागपुरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama

Jayant Patil : नागपूर : केंद्रात आणि राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे. मात्र, त्यांचा कारभार जनतेला काही पटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहिला आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली तर नक्कीच जनता संधी देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

Jayant Patil
मी आणि मुख्यमंत्री शिंदे निष्ठावान शिवसैनिक, त्यांनी दसरा मेळावा घ्यावा...

जयंत पाटील विदर्भ दौऱ्यावर होते. दौऱ्यामध्ये त्यांनी मंगळवारी नागपुरमधील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या दौऱ्यामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. विदर्भात पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी नागपुरमधील ग्रामीण व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा भाजपशी असून नागपूर जिल्ह्यात पक्षाला मोठी संधी असल्याचे जयंत पाटील म्हणाले. नागपूर मधील संघटना बळकट करण्यासोबतच बुथ कमिटी गठित करण्याचे आवाहन त्यांनी केले. पक्षाची सभासद नोंदणी सध्या सुरू असून या मोहिमेला अधिक लोकांपर्यंत नेण्यासही त्यांनी सांगितले.

Jayant Patil
सिसोदिया अडचणीत आल्याने केजरीवाल सरकारचा 'यू-टर्न'; धोरणच केले रद्द

जयंत पाटील यांचा हा दुसरा विदर्भ दौरा होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही विदर्भातील काही जिल्ह्याचा दौरा केला होता. विदर्भामध्ये पक्ष संघटना बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ठाण्यातून आपला दौरा सुरु केला आहे. ते काही निवडक जिल्ह्यामध्ये जाणार आहेत. त्याच बरोबर त्यांनी नेत्यांनाही राज्याचा दौरा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in