Jayant Patil : नागपूर दौऱ्यात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांचा घेतला क्लास...

मरावती, वर्धा, गडचिरोली आदी जिल्ह्यांचा दौरा आटोपून जयंत पाटील (Jayant Patil) मंगळवारी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना क्रियाशील सदस्य नोंदणीचे टार्गेट दिले.
Jayant Patil in Nagpur Meeting
Jayant Patil in Nagpur MeetingSarkarnama

नागपूर : नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ एक नगरसेवक होता. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात नागपूरला नेहमीच मंत्रिपद देण्यात आले. पण त्या मानाने पक्ष येथे वाढला नाही. प्रदेश कार्यकारिणीतही नागपूरच्या नेत्यांचा भरणा जास्त आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांपासून (Sharad Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार, (Ajit Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी नागपूरचे दौरे केलेले आहेत. तरीही येथे पक्ष वाढत नसल्याने जयंत पाटील यांना नाराजी व्यक्त केली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा त्यांना चांगलाच क्लास घेतला.

फक्त पदे घेऊन पक्ष वाढणार नाही. प्रत्येकाला सक्रिय योगदान द्यावे लागेल. याकरिता क्रियाशील सदस्यांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती, वर्धा, गडचिरोली आदी जिल्ह्यांचा दौरा आटोपून जयंत पाटील (Jayant Patil) मंगळवारी नागपूरला (Nagpur) आले होते. यावेळी त्यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांना एक हजार तर इच्छुकांना पाचशे क्रियाशील सदस्य नोंदणीचे टार्गेट दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक ११ सप्टेंबरला होऊ घातली आहे. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक होईल. त्याकरिता अधिकाधिक क्रियाशील सदस्य राष्ट्रवादीच्यामार्फत नोंदवले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याकरिता राज्यभर दौरा करीत आहेत. विशेष म्हणजे प्रदेश कार्यकारिणीत नागपूरमधील सर्वाधिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Jayant Patil in Nagpur Meeting
Sangali Politics: जयंत पाटील अॅक्शन मोडमध्ये; कोपरा सभेतून मोर्चेबांधणीला सुरुवात

त्या मानाने पक्षाचा विस्तार फारच मर्यादित असल्याने वरिष्ठ नेते नाराज आहेत. मंगळवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेश बंग, सलील देशमुख, शब्बिरकुमार विद्रोही, राजू जैन, शेखर सावरबांधे, दीनानाथ पडोळे, ईश्वर बाळबुधे, वर्षा शामकुळे, रमण ठवकर, वेदप्रकाश आर्य आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com