Sangha Mukhyalay
Sangha MukhyalaySarkarnama

जैश-ए-मोहम्मदकडून नागपुरात रेकी, संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवली...

देशाचा झिरो मैल नागपुरात (Nagpur) आहे. कोणत्याही दहशतवादी शक्तींना येथपर्यंत पोहोचणे तेवढे सोपे नाही. तरीही दहशतवादी येथपर्यंत पोहोचतातच कसे, हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे.

नागपूर : संघाच्या देशभरातील स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान असलेले नागपुरातील (Nagpur) संघ मुख्यालय नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर राहिलेले आहे. संघ मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झालेला आहे. पण नुकतीच जैश-ए-मोहम्मद या जहाल अतिरेकी संघटनेकडून नागपुरात रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका आहे. नागपूर हे शहर देशाच्या (India) मध्यस्थानी आहे. देशाचा झिरो मैल नागपुरात आहे. कोणत्याही दहशतवादी शक्तींना येथपर्यंत पोहोचणे तेवढे सोपे नाही. तरीही दहशतवादी येथपर्यंत पोहोचतातच कसे, हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. पण आज मिळालेल्या या माहितीनंतर नागपूर पोलिस (Police) सतर्क झाली असून संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

सन १९९८ मध्ये संघाची बैठक येथे होती, त्यावेळीही असा प्रकार झाला होता. १९९८ मध्येच ६ डिसेंबरला बाबरी मशीद जीर्णोद्धाराच्या वेळी अशीच रेकी करून संघ मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतरच्या काळात मुख्यालय परिसरात एकदा एनकाऊंटरही झाले होते. गत ९७ वर्षांपासून संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर राहिलेले आहे. संघाबद्दल कॉंग्रेस, कम्युनिस्टांनी मुस्लिम समाजातील लोकांच्या द्वेष पसरविला आहे. ते दहशतवाद्यांना अशा घटना घडविण्यासाठी प्रोत्साहित करीत असतात. त्यामुळेच संघ मुख्यालय २३ दहशतवादी संघटनाच्या रडारवर राहिलेला आहे. पण संघाच्या स्वयंसेवकांना गेल्या ९७ वर्षांपासून या सर्व गोष्टींची सवय झालेली आहे, असे संघाचे दिलीप देवधर यांनी सांगितले.

Sangha Mukhyalay
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माघार घेतली पण संघ परिवार नाराजच

आज नागपुरात जैश-ए-मोहम्मद या जहाल दहशतवादी संघटनेने रेकी केली. यादृष्टीने सरकार सुरक्षा चक्र मजबूत करेलच. जगभरातील भारतविरोधी घटना घडवणाऱ्यांच्या टारगेटवर संसद भवन, पंतप्रधान कार्यालय, संघ कार्यालय आदी राहिलेले आहे. रेकी झाल्याची जी माहिती मिळाली. त्यानुसार सीसी टीव्ही सारख्या तांत्रिक पद्धतींचा अवलंब करून याचा तपास झाला पाहिजे आणि तात्काळ संघ मुख्यालय परिसरात सशस्त्र जवान तैनात केले पाहिजे. नागपूर पोलिस कशाही परिस्थितीशी निपटण्यात सक्षम आहेत. ते ही व्यवस्था करतीलच. या परिसरातील रस्ते अरुंद आहेत, त्यादृष्टीने येथे व्यवस्था लावण्याची गरज असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com