Mungantiwar : जगातल्या सर्व संपत्तीपेक्षाही ‘जगदंबा’ आमच्यासाठी मोठी आहे...

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, (Sudhir Mungantiwar) जेव्हा ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले, त्यानंतर आम्ही महाराजांची तलवार महाराष्ट्रात (Maharashtra) आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. केंद्र सरकारला आम्ही तशी विनंती केली आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Chhatrapati Shivaji Maharaj नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या लढायांमध्ये अनेक तलवारी वापरल्या. त्यातील एक जगदंबा ही तलवार १९७५ ते ७५ मध्ये तेव्हाचे प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीवर आले असताना छत्रपती शिवाजी महाराज (चौथे) यांनी त्यांना भेट दिली होती. ती तलवार आता पुन्हा आमच्या राजांच्या महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले, (Sudhir Mungantiwar) जेव्हा ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले, त्यानंतर आम्ही महाराजांची तलवार महाराष्ट्रात (Maharashtra) आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. केंद्र सरकारला आम्ही विनंती केली आहे आणि त्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) विजयादशमीच्या पूजेची जी तलवार होती, ती रत्नजडित, हिरेजडित जगदंबा तलवार आता इंग्लंडच्या राणीच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये ठेवण्यात आली आहे. ही तलवार भारतात (India) परत आणावी अशी तमाम जनतेची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

जगदंबा तलवारीला शिवाजी महाराजांचा पवित्र, पावन स्पर्श झालेला आहे. आमच्यासाठी जगातल्या सर्व संपत्तीपेक्षाही ही तलवार मोठी आहे. त्यामुळे आमच्या सांस्कृतिक विभागाकडून ती तलवार परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र सरकारकडे आम्ही पत्रव्यवहार सुरू केला आहे आणि ऋषी सुनक यांच्याशी चर्चा करून ही तलवार महाराष्ट्रामध्ये परत यावी, यासाठी आम्ही काम करणार आहोत, असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar
मत्स्य संशोधन केंद्र स्थापण्यासाठी मुनगंटीवार आग्रही, चार जिल्ह्यांना मिळणार लाभ !

साधारणतः शिवराज्यभिशेकाला सन २०२४ मध्ये ३५० वर्ष पूर्ण होतील आणि त्या दृष्टीने आम्ही मोठा आराखडा तयार करतो आहोत. या सर्व कार्यक्रमांत जगदंबा तलवार आम्हाला ब्रिटन सरकारने दिली तर निश्‍चितपणे आमचा आनंदोत्सव उत्तमपणे साजरा करण्यासाठी आम्हाला मोठी मदत होणार आहे. त्यासाठीच आम्ही महाराजांची तलवार मागितली आहे. केंद्र सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे महाराजांची तलवार महाराष्ट्रात परत आणण्यात आम्हाला यश मिळेल, अशी आशा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in