Vidarbha : म्हैसाळकरांची ती सही ठरली शेवटची; संमेलन विदर्भातच घेण्याचा होता आग्रह !

विदर्भ (Vidarbha) साहित्य संघाच्या अध्यक्षपदाचा काटेरी मुकुट सांभाळत अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी सरस्वतीची सेवा केली.
Manohar Mahisalkar, Vidarbha
Manohar Mahisalkar, VidarbhaSarkarnama

नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, उत्तम संघटक मनोहर म्हैसाळकर यांचे निधन झाले. विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाचा काटेरी मुकुट सांभाळत अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी सरस्वतीची सेवा केली. दोन दिवसांपूर्वीच (बुधवारी) अखिल भारतीय मराठी महामंडळाला पाठविलेल्या पत्रावर त्यांनी स्वत: सही केली होती. दुर्दैवाने ती सही त्यांची अखेरची ठरली.

विदर्भ (Vidarbha) साहित्य संघ ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक घटक संस्थेप्रमाणे वर्धा (Wardha) येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे नाव नियमाप्रमाणे वि. सा. संघातर्फेही अंतिम करण्यात आले. याबाबत महामंडळासोबत वि. सा. संघाने केलेल्या पत्रव्यवहारात मनोहर म्हैसाळकरांनी स्वत: जातीने लक्ष दिले. बुधवारी (ता. १२) या नावांसह तयार केलेले पत्रावर म्हैसाळकरांनी स्वत: सही केली होती आणि त्यानंतरच ते पत्र महामंडळाला पाठविण्यात आले.

यातून त्यांची साहित्याप्रति, विशेषतः: विदर्भ साहित्य संघाप्रति असलेली आस्था नव्याने अधोरेखित झाली. तसेच, विदर्भ साहित्य संघ शताब्दी वर्ष साजरे करीत असताना ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे विदर्भ साहित्य संघाच्या पुढाकाराने विदर्भातच व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार, साहित्य महामंडळाला आमंत्रणाचे पत्र पाठविण्यात आले. घटक संस्थेचे निमंत्रण आणि शताब्दी वर्ष असल्याने नियमाप्रमाणे साहित्य मंडळाने वि. सा. संघाच्या आमंत्रणाला प्राधान्य दिले आणि संमेलनासाठी वर्धेचे स्थळ घोषित करण्यात आले. संमेलनाच्या आयोजनाबाबत देखील ते अखेरपर्यंत पाठपुरावा करीत होते. अशातच, बुधवारी त्यांनी या पत्रावर सही केली अन्‌ दुर्दैवाने गुरुवारी त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची वेळ आली.

दुर्दैवी योगायोग..

मनोहर म्हैसाळकरांनी विदर्भ साहित्य संघात अनेक पदे भूषविली आहेत. विशेष म्हणजे, याच वर्षी विदर्भ साहित्य संघामध्ये सदस्यत्वाची त्यांनी पन्नास वर्षे पूर्ण केले होते. तर, १ ऑगस्ट रोजी त्यांनी वयाचे नव्वद वर्षे पूर्ण केले आणि योगायोग म्हणजे विदर्भ साहित्य संघ सध्या शताब्दी वर्ष साजरा करते आहे. अशात, दुर्दैवाने त्यांच्या निधनाची बातमी आज सायंकाळी साहित्य वर्तुळात धडकली अन्‌ साऱ्यांनाच धक्का बसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com