Legislative Council Election : पदवीधर निवडणुकीत कोणत्या उमेदवाराकडे किती संपत्ती?, भाजपच्या पाटलांकडे...

Legislative Council Election : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (ता. 12) शेवटचा दिवस आहे.
Legislative Council Election, Dr. Ranjit Patil News
Legislative Council Election, Dr. Ranjit Patil News Sarkarnama

Legislative Council Election : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (ता. 12) शेवटचा दिवस आहे. यामध्ये उमेदवारांनी अर्ज भरताना आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांनी काही उमेदवारांची माहिती मिळाली आहे.

त्यामध्ये अमरावती (Amravati) विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे (BJP) उमेदवार डॉ. रणजित पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांचे वार्षिक उत्पन्न 77. 64 लाख रुपये आहे. तसेच त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा यांचे 1.73 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्तांसह एकूण 29. 38 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Legislative Council Election, Dr. Ranjit Patil News
Satyajeet Tambe News : सरकारनामा ओपनमाईक कार्यक्रमातच आमदारकीबद्दल तांबेंनी केलं होतं 'सूचक' वक्तव्य!

डॉ. प्रफुल्ल अजबराव राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस)

अमरावती विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे (NCP) उमेदवार म्हणून डॉ. प्रफुल्ल अजबराव राऊत यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 14. 77 लाख रुपये आहे. एकूण जंगम मालमत्ता त्यांच्या नावावर 20 लाख रुपये आहे. तर, पत्नी मनीषा गृहिणी आहे.

किरण अर्जुन चौधरी ( प्रहार जनशक्ती पक्ष)

प्रहार जनशक्ती पक्षाकडून किरण अर्जुन चौधरी यांनी अमरावती विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 4. 96 लाख रुपये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रोख रक्कम त्यांच्या जवळ 20 हजार रुपये आणि स्वप्नाली चौधरी जवळ 10 हजार रुपये आहे. एकूण जंगम मालमत्ता-स्वतःच्या नावावर 18.29 लाख रुपये आहे.

Legislative Council Election, Dr. Ranjit Patil News
Satyajeet Tambe News : नाशिकसाठी 'ती' बैठक ठरली महत्त्वाची; तांबेंच्या उमेदवारी संदर्भात पडद्यामागे काय घडले?

किरण नारायण पाटील (भाजप)

औरंगाबाद (Aurangabad) शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून किरण नारायण पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांचे वार्षिक उत्पन्न 21.05 लाख रुपये आहे. पत्नी रोहिणीचे 6. 38 लाख रुपये आहे. रोख रक्कम 75 हजार रुपये आहे. पत्नीकडे 70 हजार रुपये रोख आहे. एकूण जंगम मालमत्ता-स्वतःच्या नावावर ३३ लाख रुपयांची आहे. पत्नीकडे 12. 97 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. एकूण जंगम मालमत्ता-स्वतःच्या नावावर 6.65 कोटी आहे. पत्नीकडे 60. 77 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर 1. 56 कोटी आणि पत्नीवर 62. 52 लाख रुपयांचे बँक कर्ज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com