हनुमान चालिसा आणि भोंग्याचे राजकारण बघून खंत वाटते…

नुमान चालिसा यांवरून जे राजकारण केले जात आहे, त्याचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला खंत वाटते, असे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) म्हणाले.
हनुमान चालिसा आणि भोंग्याचे राजकारण बघून खंत वाटते…
Vishwajeet KadamSarkarnama

भंडारा : महाविकास आघाडी तयार करून आम्ही शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न करीत आहोत. पण राज्यात भोंगे आणि हनुमान चालिसा यांवरून जे राजकारण केले जात आहे, त्याचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला खंत वाटते, असे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) म्हणाले.

राज ठाकरे आणि राणा दाम्पत्य यांचे नाव न घेता त्यांनी राज्यातील सद्यःस्थितीबाबत त्यांना टोले लगावले. ते म्हणाले, काही लोक राज्यातील (Maharashtra) मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी अस्तित्वात नसलेले मुद्दे उकरून काढून त्याचे राजकारण करीत आहेत. राज्यातील वातावरण गढूळ करण्याचे काम सध्या केले जात आहे. पण राज्यातील सुजाण जनता त्यांचा हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही. अतिशय खालच्या पातळीवर राजकारण करून विरोधकांच्या हाती काहीही लागणार नाही. अशा कृत्यांमुळे त्यांचीच प्रतिमा मलिन होत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाहीये. आता जनताच त्यांना धडा शिकवणार आहे.

गोसेच्या बॅक वॉटरचा घेतला आढावा..

विदर्भातील महाकाय गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा आढावा घेतला असून योग्य उपाययोजना करणार आहोत, असा विश्‍वास विश्‍वजित कदम यांनी भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना दिला. आज भंडारा जिल्हा दौरा दोऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यात गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरची समस्या वाढली असून आम्ही गोसे प्रकल्पाच्या पूर पाण्याची सर्वोच्च पातळी तपासली असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले. गोसे प्रकल्पाने पूर पातली ओलांडल्यावर ज्या जमिनी, शेती बाधित होतात त्यांचा सर्वांच्या अहवाल पाटबंधारे विभागाकडून घेतला असून शासन दरबारी त्याच्या योग्य पाठपुरावा करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Vishwajeet Kadam
विश्वजित कदम यांची कसोटी; राष्ट्रवादीनेच केलीय गंमत

क्वचितच उद्भवते पूर परिस्थिती..

जिल्ह्यात पूर परिस्थिती क्वचित घडत क्वचितच उद्भवते. पण त्यासाठी उपाययोजना करण्यावर आता भर दिला जाणार आहे. पुरामुळे आतापर्यंत जे नुकसान झाले, ते यापुढे होऊ नये, याकडे सरकारचे कटाक्षाने लक्ष असणार आहे. तशा उपाययोजना करण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आणि मी स्वतः त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे विश्‍वजित कदम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.