MNS : महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच चित्रपटावरून वाद होणे खेदजनक...

मनसेच्या (MNS) वतीने हा चित्रपट आम्ही लोकांना मोफत दाखवला. या चित्रपटातून लोकांनी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा आणि आनंद घ्यावा, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबविला, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.
MNS Aditya Durugkar
MNS Aditya DurugkarSarkarnama

Maharashtra Navnirman Sena नागपूर : हर हर महादेव या चित्रपटावरून राज्यात वादंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि छत्रपती संभाजी राजेंनी या चित्रपटाला विरोध केला आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थनार्थ उतरली आहे. नागपुरात (Nagpur) काल हर हर महादेव चित्रपटाचा विशेष शो मोफत दाखवण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shvaji Maharaj) महाराष्ट्रात (Maharashtra) त्यांच्या चित्रपटावरून विरोधाभास निर्माण होणे दुर्भाग्यपूर्ण आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आजवर लोकांपर्यंत न पोहोचलेला आपल्या राजाचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचतो आहे. या चित्रपटाबद्दल कुणाचे काही मतभेद असतील, ते समजू शकतो. पण थियेटरमध्ये जाऊन वाद निर्माण करणे, आपल्याच मराठी बांधवांना मारहाण करण्याचे प्रकार घडले. महाराष्ट्रासाठी ही शोकांतिका आहे. म्हणून मनसेच्या (MNS) वतीने हा चित्रपट आम्ही लोकांना मोफत दाखवला. या चित्रपटातून लोकांनी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा आणि आनंद घ्यावा, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबविला, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष (District Chief) आदित्य दुरूगकर यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

काल दिवसभरात ३ शोचे आयोजन मनसेकडून करण्यात आले. शालेय अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. पण त्यातून जेवढा तो कळलेला नसेल, तेवढा चित्रपटाच्या माध्यमातून समजून घेता येतो. त्यामुळे महिला, पुरुषांसह विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केल्याचे मनसेचे शहराध्यक्ष विशाल बडगे म्हणाले. अकबर, बाबर यांच्याबद्दल पुस्तकांमधून खूप शिकवले गेले आहे. पण शिवाजी महाराजांचे पराक्रम आभाळभर आहेत, पण चित्रपटाच्या माध्यमातून आजवर ते मांडण्याचा साधा प्रयत्नही कुणी केला नाही. हर हर महादेव हा महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक चांगले माध्यम आहे, असे चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.

MNS Aditya Durugkar
..म्हणून आम्ही संभाजीराजे अन्‌ उदयनराजे यांचे आभार मानले : ‘हर हर महादेव’च्या दिग्दर्शकांनी मांडली भूमिका!

मनसेच्यावतीने राज्यभर हा सिनेमा दाखविला जात आहे. मुंबईमध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांनी चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन केले होते. तर काल नागपुरात जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी तीन शो आयोजित करून नागपूरकरांना हा सिनेमा दाखवला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या चित्रपटाला विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत हा सिनेमा बंद पाडला होता. त्यावेळी चित्रपटगृहात मोठा वादंग झाला होता. कार्यकर्त्यांकडून प्रेक्षकांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल रोष व्यक्त करण्यात आला होता. नागपुरातही राष्ट्रवादी कॉंग्रेस मनसेच्या या उपक्रमाला विरोध करेल, अशी शंका व्यक्त केली गेली होती. पण काल तसे काही घडले नाही आणि हर हर महादेवचे मोफत शो सुरळीत पार पडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in