प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही, कर्मचाऱ्यांनी संप मिटवावा...

रोजगार निर्माण व्हावा, येवढीच माझी प्रामाणिक भूमिका असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार Minister Vijay Wadettiwar यांनी आज येथे सांगितले.
Minister Vijay Wadettiwar
Minister Vijay WadettiwarSarkarnama

नागपूर : एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी केलेला संप चिघळतो आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. पगार वाढवण्याची आवश्यकता आहे, असे असले तरी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

न्यायालयाच्या माध्यमातून संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये राज्य सरकारला नक्कीच यश येईल. त्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी मधला मार्ग काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू आहेत. पण विरोधी पक्षातील नेते कर्मचाऱ्यांना चिथावीत आहेत. त्यामुळे संप चिघळत चालला आहे. विरोधी पक्ष प्रवाशांना वेठीस धरत आहे. हे आता जनतेच्या लक्षात येते आहे की, सरकारच्या प्रयत्नांना विरोधी पक्षाकडून खीळ घालण्‍याचे काम सुरू आहे. त्यामुळेच हा राज्यावर ही परिस्थिती ओढवली असल्याचे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.

तेव्हा का नाही केले विलीनीकरण?

भारतीय जनता पक्षाचे नेते आज एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी ओरडत आहे. ते सत्तेत होते तेव्हा का नाही केले विलीनीकरण? तेव्हा तर हे विलगीकरण होऊ शकत नाही, असे त्यांचे नेते सांगत होते. अन् आज त्यांना एसटी कर्मचाऱ्यांचा येवढा पुळका का आला, असा प्रश्‍न वडेट्टीवार यांनी विचारला आहे. आताही कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी सरकारची विनंती आहे. या संपावर सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचे आमचे प्रयत्न आताही सुरू आहेत. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याची आणि मार्ग काढण्याची आमची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

Minister Vijay Wadettiwar
वडेट्टीवार, मुंडे यांचे असेही लक्ष : मोक्याच्या क्षणी ओबीसी आयोगाच्या सचिवाची बदली

नक्षलवाद्यांनी माझ्यावर जे काही आरोप केले, त्याची चौकशी गृहविभाग करत आहे. सुरजागडची लोहखनिज खाण रद्द करावी आणि ते का गरजेचे आहे, ही बाब गृह विभागाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. तसे पाहिले तर सुरजागडच्या लोहखनीज खाणीशी, ती सुरू किंवा बंद होण्याशी माझा काही संबंध नाही. यासंदर्भात एटापल्लीला जे आंदोलन होते, तेथे मी जाऊ शकलो नाही. कारण त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. लोह खनिज खाणीच्या मालकांशीही माझा काही संबंध नाही. बस रोजगार निर्माण व्हावा, येवढीच माझी प्रामाणिक भूमिका असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com