नाना म्हणाले, आमच्या काऊंटर अटॅकनंतर ते शांत झाले…

त्यांनी आज विधानभवनातील वातावरण आणखी गढूळ केले असते. पराभव त्यांना डोळ्यांसमोर दिसतो आहे. त्यामुळे असले प्रकार केले जात असल्याचे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
Nana Patole
Nana Patole Sarkarnama

नागपूर : राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले आहे. आता ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अंदाजे ७ वाजेपर्यंत बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील आणि आम्ही गुलाल उधळू, असा विश्‍वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

एमआयएम (MIM) आमच्याकडे आलेली नाही आणि आम्हीही त्यांच्याकडे गेलेलो नाही. त्यांना जे काय करायचं, ते त्यांनी ठरवलं. भारतीय जनता पक्षाने (BJP) आमच्या दोन मतांवर आक्षेप घेतला, त्यानंतर आम्हीही त्यांच्या एका मतावर आक्षेप घेतला. त्यांच्या अटॅकवर आमच्या काऊंटर अटॅकनंतर कुठे ते शांत झाले. नाहीतर त्यांनी आज विधानभवनातील वातावरण आणखी गढूळ केले असते. पराभव त्यांना डोळ्यांसमोर दिसतो आहे. त्यामुळे असले प्रकार केले जात असल्याचे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, भाजपने आधी आमच्या दोन मतांवर आक्षेप घेतला. त्यानंतर आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर कुठे ते चूप बसले. त्यांनी बाभळीची झाडे लावली आहेत. आता त्यांच्यापुढे काटेच निघणार आहेत, त्यांना आंबे थोडीच मिळणार. आमच्या मतदानावर आक्षेप घेऊन त्यांनी आज विधान भवनातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनाच विचारले पाहिजे की, मुनगंटीवाराचं काय झाले? तेव्हाच सर्व प्रकार कळेल.

Nana Patole
Video: भाजपने नाइलाजाने त्या दोन प्रवक्त्यांना निलंबित केलं !; नाना पटोले

या निवडणुकीत खुली मतदान पद्धती होती. पक्षाच्या आमदारांनी आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांना मते दिली. मतदान व्यवस्थित झाले आहे. चुकीच्या बातम्या पेरण्याचे काम भाजप करत आहे. राज्याची बदनामी करण्याचे काम करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून अशी चूक होणे अपेक्षित नव्हते. पण हे घडले आहे आणि ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष हारण्याच्या वाटेवर आहे, म्हणून ते वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in