उमेश कोल्हे हत्याकांडाची लिंक दिल्लीत तर जुळत नाही? यशोमती ठाकुरांना शंका...

ही सगळी प्रकरणं जर बघितली, तर त्याची लिंक अमरावतीमध्ये येते, असे आमदार ठाकूर (Yashoati Thakur) यांनी सांगितले.
Yashomati Thakur
Yashomati ThakurSarkarnama

अमर घटारे

अमरावती : अमरावती हा सलोखा ठेवणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याला कुणी प्रयोगशाळा करू पाहात असेल, तर आम्ही ते होऊ देणार नाही. राजस्थानमधील उदयपूर येथे जशी घटना घडली, अगदी तशीच घटना अमरावतीमध्ये २१ जून रोजी झाली. आमच्या जिल्ह्यात जे भाजप प्रणीत आमदार, खासदार आहेत, त्यांनी जे पत्र दिले. त्यानंतर आम्हाला अशी शंका आहे, की या प्रकरणाची लिंक दिल्ली किंवा इतरत्र तर जुळत नाहीये ना, असा सवाल आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांनी उपस्थित केला.

उदयपूरमधील त्या टेलरचा मारेकरी भाजपचा कार्यकर्ता निघाला आणि अमरावतीमध्ये जी हत्या झाली, त्याचा मास्टरमाईंड अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या जवळचा कार्यकर्त्या निघाला. आणि हे खासदार व आमदार भाजपच्या अतिशय जवळचे आहेत. याशिवाय देशभर जर पाहिले मध्यप्रदेश, आसाम, जम्मू काश्‍मीरमध्येसुद्धा हेच बघण्यात आले आहे. मध्यप्रदेशात एक कार्यकर्ता आयएसआयच्या घोटाळ्यात पकडला गेला. हा कार्यकर्ता भाजपच्या आयटी सेलचा सदस्य निघाला.

बजरंग दलाच्या एक कार्यकर्ता टेरर फंडींगमध्ये पकडला गेला. अशी सगळी प्रकरणं शंका घेण्यास वाव देतात. पुलवामाचे काय झाले, ते अद्यापही कळले नाही. ज्या ठिकाणी ‘पंछी भी पर नही मार सकता’ तेथे २०० किलो आरडीएक्स पोहोचते. ते कसे पोहोचले, याचीही चौकशी अद्याप झाली नाही. पार्लामेंटमध्ये हल्ला झाला होता, त्या हल्ल्याचा जो मारेकरी होता. त्याला सोडवण्यातही याच लोकांना हात कुठेतरी दिसतो आहे. ही सगळी प्रकरणं जर बघितली, तर त्याची लिंक अमरावतीमध्ये येते, असे आमदार ठाकूर यांनी सांगितले.

मागील काळातील घडामोडी बघता हे लोक अमरावतीला प्रयोगशाळा तर बनवत नाहीये नाही, अशी शंका सहजच येते. येथे आतंकवादाशी संबंधित लोकांचा हस्तक्षेप वाढतोय आणि धर्मांध शक्ती येथे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे वाटते. या सर्व घडामोडी आता कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि चौकशी योग्य दिशेने झाली पाहिजे. उदरपूरची घटना २८ तारखेला घडली त्यापूर्वीच २७ ला खासदार नवनीत राणा यांचं पत्र, म्हणजे शंका घ्यायला पुरेपूर वाव आहे. ज्यांनी २७ जूनला पत्र लिहिले, त्यांना २८ जूनची घटना आधीच कशी माहिती झाली, हा मोठा प्रश्‍न आहे. देशभरात घडलेल्या आणि घडत असलेल्या सर्व घटनांची लिंक कुठेतरी अमरावतीमध्येच तर नाहीये ना, अशी शंका यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

Yashomati Thakur
Video: मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुक्मिणीच्या पालखीचे स्वागत करत फुगडी वर धरला ताल

राणा दाम्पत्यासह खासदार अनिल बोंडेना अटक करा..

खासदार नवनीत राणा, बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि खासदार अनिल बोंडे यांच्या हालचाली उमेश कोल्हे प्रकरणात संशयास्पद वाटत आहेत. या तिघांनाही अटक करून त्यांची चौकशी करण्याची मागणी, दिलीप एडतकर यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com