Nana Patole यांची पकड सुटत चाललीय का? केदार, वडेट्टीवारांचे अडबालेंना समर्थन !

Congress : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत मतभेद तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Nana Patole latest news
Nana Patole latest newsSarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : उद्या मुंबईत महाविकास आघाडीतील सहभागी पक्ष संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नाशिक आणि नागपूरच्या संदर्भात घोषणा करणार आहोत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सकाळी नागपुरात पत्रकारांना सांगितले होते. पण त्यापूर्वीच नागपुरात (Nagpur) नाना पटोले यांच्या अनुपस्थितीत बैठक घेऊन माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार यांनी सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले.

आज आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी विमाशिचे अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत मतभेद तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. तिकडे भंडाऱ्यातही जिल्हा परिषद अडचणीत आली आहे. नाना पटोले यांना ज्यांनी साथ दिली, ते भाजपमधून निष्कासीत केलेले चरण वाघमारे यांच्या तीन जिल्हा परिषद सदस्यांवर अपात्रतेची तलवार लटकली आहे. तेथे सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

निवडणुकीचे नियोजन आणि समर्थनाबाबत आज काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांनी वडेट्टीवार यांच्या रामदास पेठ येथील निवासस्थानी बैठक घेतली. त्यास सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांच्यासह राजेंद्र मूळक, बबनराव तायवाडे, रवींद्र दरेकर आदी उपस्थित होते. यावेळी केदार आणि वडेट्टीवार यांनी अडबालेंना काँग्रेसने समर्थन दिले असल्याचे पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. आमदारांनी परस्पर नाव जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये अडबाले यांच्या नावावरून मतभेद असल्याचा तर्क लावला जात आहे.

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांना असतो. आमदारांनी घाई केल्याने काँग्रेसचे अनेक नेतेही आश्चर्य व्यक्त करीत आहे. पटोले यांच्या मनात दुसरे नाव तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. प्रचार व नियोजनासाठी अवघे पंधरा दिवस हातात आहेत. सर्वच पक्ष व संघटना तयारीला लागले आहेत. आमचा उमेदवार मागे पडू नये, याकरिता तातडीची बैठक घेण्यात आली. अडबाले यांना समर्थन द्यायचे निश्चित झाले आहे. प्रदेशाध्यक्ष उद्या ते घोषित करणारच आहेत.

Nana Patole latest news
Wadettiwar : ..तर ती आनंद भेट ठरली असती, असं का म्हणाले आमदार विजय वडेट्टीवार ?

लपवून ठेवण्यासारखे काही नाही, त्यामुळे अडबाले यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार अडबाले आणि शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसला समर्थन मागितले आहे. आधी शिवसेनेसाठी ही जागा सोडण्यात आली होती. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा असंतोष उफाळून आल्याने नाशिकच्या बदल्यात नागपूरची जागा मागण्यात आली. त्यानुसार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. काँग्रेसचे काही नेते अडबाले यांना समर्थन देण्यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे पदवीधरमध्ये काँग्रेसने दिलेला शब्द पाळावा आणि झाडे यांना पाठिंबा द्यावा, या मताचे काही नेते असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com