IPS Transfers : नागपूरच्या नीवा जैन यांची दिल्ली, तर अमरावतीच्या राहुल खाडेंची जालन्याला बदली…

Amravati : राहुल खाडे यांची बदली जालन्याचे अपर पोलिस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे.
IPS Transfer, Amravati and Nagpur.
IPS Transfer, Amravati and Nagpur.Sarkarnama

Two IPS Officers Transferred from Vidarbha : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गृह विभागाने आज बदल्यांचा आदेश जारी केला. राज्यातील ८ आयपीएस अधिकाऱ्यांना आजच्या आदेशाने नियुक्ती मिळाली आहे. यामध्ये विदर्भातील दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गृह विभागाच्या आदेशात राज्यातील एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये विदर्भाच्या नागपूर शहरच्या अपर पोलिस आयुक्त नीवा जैन आणि अमरावती (Amravati) गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांचा समावेश आहे. नीवा जैन यांची बदली अपर निवासी आयुक्त, सचिव व निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन कार्यालय, नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे. राहुल खाडे यांची बदली जालन्याचे अपर पोलिस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालयात योग्य ताळमेळ अभावी रखडलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहुर्त मिळाला. सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात समन्वय नसल्यामुळे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून पदस्थापनाच देण्यात आली नव्हती.

IPS Transfer, Amravati and Nagpur.
Pune Police Bharati : पुण्यातील पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती; जाणून घ्या, काय आहे कारण?

काही अधिकारी अद्यापही बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. बदल्यांचे वारे वाहत असल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांनाही बदल्या, विनंती बदल्या आणि पदोन्नतीचे वेध लागले आहे. राजकीय दबावापोटी पदोन्नती आणि विनंती बदल्या रखडल्याची सध्या ओरड आहे. गृहमंत्रालयाने खोडा घातल्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयातून कोणतेही सूत्र हलवता येत नसल्यामुळे राज्यभरातील पोलीस अधिकारी संभ्रमात पडले असल्याचे सूत्र सांगतात.

IPS Transfer, Amravati and Nagpur.
IPS Officer Transfer : राज्यातील 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

नीवा जैन नागपूर (Nagpur) शहरच्या अपर पोलिस अधीक्षक असताना त्यांच्याकडे दोन रिजन आणि क्राईम ब्रांचची जबाबदारी होती. दोन रिजनची जबाबदारी असलेल्या त्या एकमेव पोलिस Police) अधिकारी होत्या. नागपूर उत्तर आणि नागपूर दक्षिण या दोन्ही रिजनचे काय त्यांनी यशस्वीपणे सांभाळले. एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. नागपूर पोलिस विभागात कामाला शिस्त लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in