Nagpur शिक्षक मतदारसंघात ‘या’ राजकीय पक्षांतील 'अदृश्य हात’ करतील करिश्मा

NCP मध्ये काम करीत असताना सर्वपक्षीय लोकांशी माझा जवळचा संबंध आला.
Satish Itkelwar, NCP
Satish Itkelwar, NCPSarkarnama

Nagpur Teachers Constituency : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते राहिलेले सतीश इटकेलवार यांनी पक्षाशी बंडखोरी करून नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आपला अर्ज कायम ठेवला. पक्षाने त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केलेली आहे. असे असले तरी गेल्या कित्येक वर्षांपासून मी पक्षाचे काम केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही अदृश्य हात माझ्यासोबत आहेत, असे इटकेलवार म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात काम करीत असताना सर्वपक्षीय लोकांशी माझा जवळचा संबंध आला. या संबंधांचा फायदा मला या निवडणुकीत (Election) होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणेच (NCP) इतरही पक्षांमधील अदृश्य हात मदत करणार आहेत. कॉंग्रेसच्या विचारधारेचे लोक आहेत. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) शिवसेना आमच्यासोबत जुळली. त्याचाही फायदा होणार आहे.

मी आता अपक्ष उमेदवार असल्याने भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाही पाठिंबा मागण्यासाठी मला संकोच होणार नाही, असे इटकेलवार यांनी सांगितले. लवकरच फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांचे उमेदवार नागो गाणार आहे. पण गाणारांबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि तीसुद्धा उघड उघड आहे. यामधील अनेकांना गाणारांना समर्थन जाहीर करण्यापूर्वी मला समर्थन दिले होते.

ही निवडणूक मुख्यत्वे संघटनांची आहे आणि या निवडणुकीत राजकीय पक्ष फारसा प्रभाव पाडणार नाही, तर वैयक्तिक संबंधांवर ही निवडणूक होणार, असं दिसतंय. कॉंग्रेस असो किंवा भाजप, सर्वांशी चांगले संबंध आहे. आमच्या वाड्यासमोरच शाखेचे वर्ग आमच्या बालपणी भरायचे, तेथे आम्हीसुद्धा जायचो. तिकडेही माझा मोठा मित्रपरिवार आहे. त्यामुळे त्यांचा फायदा या निवडणुकीत होणार आहे.

Satish Itkelwar, NCP
Mahavikas Aghadiकडून चौथा उमेदवार रिंगणात, इटकेलवार म्हणतात आता माघार नाही !

गेल्या काही वर्षांपासून तयारी करीत असलेले शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांची उमेदवारी ऐन वेळ मागे घ्यायला लावण्यात आली. ते कितीही म्हणत असले तरी खदखद त्यांच्या मनात आहेच. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार ठरत नव्हता. आता तर त्यांचेच नेते वेगवेगळी विधाने करत सुटले आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष चुप्पी साधून आहेत. नागपूर, नाशिकच्या निवडणूक उमेदवारांवरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अडचणीत आले आहेत. पाठिंबा कुणाला, हे अद्यापही त्यांचे ठरलेले नाही. त्यामुळे या सर्व गोंधळाचा फायदा होईल, असे इटकेलवार यांनी सांगितले. सर्व पक्षांतील अदृश्य हात काय करीश्‍मा करतात, हे २ फेब्रुवारीला कळणार आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in