Nitin Gadkari News: शिक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक मैलाचा दगड ठरणार !

Union Budget Session: हा अर्थसंकल्प अमृतकाळात नवीन भारताचा पाया रचणारा आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

Budget Session 2023 News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प अमृतकाळात नवीन भारताचा पाया रचणारा आहे. १३० कोटी देशवासीयाचे जीवन सुखी आणि समृद्ध करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अर्थसंकल्पावर दिली.

आजचा अर्थसंकल्प म्हणजे नव्या भारताच्या विकासाची नांदी ठरणार आहे. ‘सबका साथ, सबका प्रयास’अंतर्गत लोकसहभागाची गरज लक्षात घेऊन अमृतकाळात तांत्रिक आणि ज्ञानावर आधारीत अर्थव्यवस्थेला दिशा देणारा हा अर्थसंकल्प (Budget) आहे. अमृत काळ अर्थसंकल्प सप्तऋषी योजनेवर आधारित आहे. यामध्ये सात बिंदूंना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि ते सर्व एकमेकांना पूरक असे आहेत. सप्तऋषींच्या रूपात ते कार्य करणार आहे, असे गडकरी म्हणाले.

यामध्ये सर्वसमावेशक विकास, गुंतवणूक, क्षमता वृद्धी, हरीत विकास, युवा शक्ती आणि अर्थ क्षेत्र या सर्व मुद्द्यांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. देशाच्या विकासात यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर विकास आवश्‍यक आहे. रस्ते, रेल्वे, वीज, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक मैलाचा दगड ठरणार आहे. त्यासोबतच व्हेईकल स्क्रॅपिंग धोरणाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आलेली असल्याचेही गडकरी म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना देण्यात आल्या आहेत. २२०० कोटी रुपयांचा आत्मनिर्भर स्वच्छ योजना कार्यक्रमाची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्याशी संबंधित धोरणांमध्ये संशोधनात आमूलाग्र बदल करण्यासाठी सरकार नवीन कार्यक्रम सुरू करणार आहे. यामुळे आरोग्य सेवा मजबूत होणार असून देशाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे, असे नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

Nitin Gadkari
Threat to Leaders : पवारांपासून, गडकरी अन् केजरीवालांपर्यंत नेत्यांना धमकीचे फोन; कारण काय?

जागतिक दर्जाचे रस्ते भारतात तयार करण्याचा जो निर्धार आम्ही व्यक्त केला आहे, तो या अर्थसंकल्पामुळे पूर्ण करता येणार आहे. ऊर्जा, हरीत ऊर्जा क्षेत्रात भरपूर काम करण्यासाठी आता वाव आहे. सामान्य माणूस आज ज्या समस्यांनी ग्रस्त आहे, त्यातील प्रमुख म्हणजे प्रदूषण. या समस्येपासून निपटण्यासाठी आता भरघोस काम करता येणार आहे. आजपर्यंतच्या अर्थसंकल्पात कधी नव्हे ते सामान्य माणसाचा विचार करण्यात आला आहे. भारताला सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे गडकरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com