Munantiwar : 'भारत जोडो'पेक्षा त्यांनी आता ‘पार्टी जोडो’ कार्यक्रम राबवला पाहिजे...

साईबाबांच्या शिर्डीमध्ये त्यांनी असत्य कथन केलं. पण हे सांगणाऱ्या लोकांनी एक निश्‍चित मुदत सांगता येत असेल तर सांगावी. म्हणजे मग लोकांचा त्यावर विश्‍वास बसेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

नागपूर : कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टिकविण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवणं हे त्या-त्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिवेशनातसुद्धा ‘आता हे सरकार काही दिवसांमध्ये पडणार’, असं भविष्य सांगितल्या गेलं. साईबाबांच्या शिर्डीमध्ये त्यांनी असत्य कथन केलं. पण हे सांगणाऱ्या लोकांनी एक निश्‍चित मुदत सांगता येत असेल तर सांगावी. म्हणजे मग लोकांचा त्यावर विश्‍वास बसेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

गोवा (Goa) येथे नाट्यगौरव पुरस्कार सोहळा आटोपून आज नागपुरात (Nagpur) दाखल झाले असता नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) ते पत्रकारांशी बोलत होते. मध्यावधी निवडणुका होतील, असे सांगून कार्यकर्त्यांना पक्षात टिकवण्याचा हा अपयशी मार्ग आहे आणि त्यांच्या दृष्टीने ही आवश्यकता आहे. पण ना मध्यावधी निवडणुका होणार आहे, ना हे सरकार पडणार. निश्‍चितपणे २०२४च्या निहित मर्यादेपर्यंत हे सरकार चालेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deendra Fadanvis) यांच्या मार्गदर्शनात या महाराष्ट्राच्या विकासाचा चेहरा वेगाने बदलावा, यासाठी कार्य होणार आहे, असे ते म्हणाले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल विचारले असता, त्यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने केलेली टिपणी अतिशय बोलकी आहे. ते म्हणाले, ‘भारत जोडना है, तब जोडेंगे, पहले पार्टी जोडो.’ त्यांची पार्टी कमजोर होत आहे, त्यांच्या पार्टीतले लोक सोडून जात आहेत आणि अशा प्रसंगात भारत जोडोपेक्षा स्वतःची पार्टी जोडो या कार्यक्रमात त्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. भारत जोडोसाठी ते निघाले आहेत, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. कारण ज्या ज्या भागातून ते चालले, तेथे तेथे भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळत आहे. त्यामुळे भाजपला मजबूत करण्यासाठी त्यांची ही यात्रा असल्याचा अनुभव येतो आहे, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar
मत्स्य संशोधन केंद्र स्थापण्यासाठी मुनगंटीवार आग्रही, चार जिल्ह्यांना मिळणार लाभ !

कोणताही इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जाऊ नये..

हर हर महादेव, या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे. चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडाल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा छत्रपती संभाजी राजेंनी दिला आहे. याबाबत विचारले असता मंत्री मुनगंटीवार म्हणाले, कोणताही इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जाऊ नये. ज्यांनी या देशात आपल्या शुरतेच, विरतेच, पराक्रमाचं योगदान दिलं आहे. त्यांचा इतिहास चुकीचा दाखवण्याचं काहीच कारण नाही. शेवटी प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in