Indian Science Congress : इतिहासात पहिल्यांदाच झाले ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन !

PM Narendra Modi : विज्ञान अणू तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Indian Science Congress News : महिला सक्षमीकरण हा विषय मुळात विज्ञानाशी जुळलेला आहे. त्यामुळे महिलांच्या भागीदारीने सक्षमीकरणासाठी विज्ञान नसून महिलांना विज्ञान अणू तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. नागपुरात (Nagpur) आजपासून सुरू झालेल्या १०८व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मोदींनी दुरदृष्य प्रणालीद्वारे इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. इतिहासातील ही पहिली घटना आहे.

व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) सायन्स आणि टेक्नॉलॉजी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, विजयालक्ष्मी सक्सेना, सुभाष चौधरी उपस्थित होते. ऑनलाइन पद्धतीने पहिल्यांदाच उद्घाटने झाल्यामुळे परिसरात हा चर्चेचा विषय होता. डॉ. विजयालक्षमी सक्सेना यांनी अध्यक्ष या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषणासाठी आमंत्रित केले. चला पुढील पाच दिवस विज्ञानाचा आनंद घेऊया, असे अस्खलित मराठीत संभाषण त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, पुढील २५ वर्षाच्या भारताच्या यशात वैज्ञानिक शक्तीचे मोठे योगदान असणार आहे. येत्या २५ वर्षात भारत देश एका वेगळ्या उंचीवर असणार आहे. त्यामध्ये भारतीय वैज्ञानिकांचे योगदान मोठे असणार आहे. विज्ञानात पॅशनसोबत देशाच्या सेवेचा संकल्प जुळतो, तेव्हा निकाल अभूतपूर्व येतात. सायंटिफीक कम्युनिटी २१व्या शतकात देशाला मोठ्या उंचीवर नेणार, यात तीळमात्र शंका नाही. निरीक्षण हा विज्ञानाचा मूळ आधार आहे. या आधारे वैज्ञानिक पॅटर्न फॉलो करून निर्णयावर पोहोचता येते.

डेटा आणि टेक्नॉलॉजी यामध्ये भारतात प्रगतीच्या दिशेने नेण्याची मोठी ताकद आहे. डेटा अॅनलाईज हे क्षेत्र माहितीला गती देत आहे. मॉडर्न टेक्नॉलॉजी सायंटीफीक डिस्कवरीमध्ये मदत करते. आपल्याला सायंटीफीक सोर्सेस मजबूत करण्यासाठी संशोधक वृत्ती विकसीत करणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात भारत जगभरातील नामांकित देशांच्या यादीत सहभागी होत आहे. २०१५ पर्यंत १३० देशात ८१ व्या क्रमांकावर आपण होतो, तर २०२२ मध्ये आपण भरारी घेत ४०व्या क्रमांकावर आलो आहोत. स्टार्टअपमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. इंडियन सायन्स कॉंग्रेसची थीम ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि वुमन एम्पॉवरमेंट’ आहे. याची चर्चा आज जगभरात होते आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्येच देशाचे भविष्य सुरक्षित आहे. या विषयाला महिला सक्षमीकरणासोबत जोडले आहे आणि व्यावहारिक दृष्ट्य़ा हे दोन विषय जुळलेले आहेत. सायन्सच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करू. येवढेच नाही तर महिलांच्या भागीदारीने सायन्सला गती देण्याचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.

Narendra Modi
PM Narendra Modi: देशातील तरुणांना जातीपाती आणि परिवाराचं राजकारण नकोय : नरेंद्र मोदी

जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्याला. यामध्येही महिला सक्षमीकरण हा प्राथमिकतेचा विषय आहे. गेल्या ८ वर्षांत भारताने गव्हर्नससह सोसायटी आणि अर्थव्यवस्था या दिशेने असाधारण काम केले आहे. ज्याची चर्चा जगभरात होते आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून लहान उद्योग आणि व्यवसायामध्ये स्टार्ट लिडरशीपमध्ये महिला आपली शक्ती दाखवत आहेत. याच ८ वर्षांत एक्स्ट्रा मोरल रिसर्चमध्ये महिलांची भागीदारी दुप्पट झाली आहे. ही वाढती भागीदारी समाजाची आणि विज्ञानाची प्रगती करीत आहे. प्राप्त ज्ञानाला ॲप्लीकेशनमध्ये बदलणे वैज्ञानिकासाठी महत्वाचे आहे. लोकांचे जीवनमान उंचावेल का, हा प्रश्‍न त्यांच्या मनात असतो. विज्ञानाचा प्रवास ग्लोबल कडून ग्रास रूटपर्यंत झाला पाहिजे. त्याचा विस्तार जर्नलपासून जमिनीपर्यंत झाला पाहिजे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in