
Opposition Meeting In Mumbai : नरडीवर बसण्यासाठी ते सर्व एकत्र येतात. देशसेवेसाठी, देशाच्या प्रगतीसाठी ते एकत्र आलेले आजवर पाहण्यात आले नाही. त्यांचा किमान समान कार्यक्रम काय, तर नरेंद्र मोदी यांना हटवणे. यांची शक्ती यामध्येच खर्ची पडणार आहे. पण मोदी काही हटणार नाहीत आणि पुन्हा तेच पंतप्रधान होतील, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (Never been seen that they have come together for the progress of the country
आज (ता. ३१) माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ‘इंडिया’त सहभागी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, त्या लोकांना सर्वच घाबरतात. त्यांना घाबरूनच चांद्रयान चंद्रावर सुखरूप ‘लॅंड’ झाले. त्यांना यंत्र घाबरतात, माणसं घाबरतात, इतकेच काय, तर त्यांचे आमदारही (MLA) घाबरतात. त्यांच्यासोबत राहिलं की करंट लागतो, असं त्यांचं मत आहे. त्यामुळेच आमदार त्यांना सोडून जातात आणि त्यांच्यावर आघाड्या करण्याची वेळ येते.
कुणाचीही चौकशी झाली की, शरद पवार (Sharad Pawar) म्हणायचे यामध्ये राजकारण केले जात आहे. पण आता ते म्हणाले की, मोदींना शंका असेल तर त्यांनी चौकशी केली पाहिजे. ही आनंदाची बाब आहे. फक्त या म्हणण्यावर त्यांनी ठाम राहावे. आता चौकश्या झाल्या तर रडायचे नाही. आम्ही राजकारणात आहो, म्हणून त्रास दिला जात आहे, असेही म्हणायचे नाही. सत्य काय आहे, हे चौकशीतून बाहेर येऊ देण्यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
दुष्काळावर उपाययोजना करताना सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. नवीन कायदा आणला आहे. त्यानुसार ३० दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे. नाही दिली तर त्यावर व्याज द्यायचे आहे. देशात शेतकऱ्यांना सर्वात जास्त नुकसान भरपाई आपल्या राज्यात दिली जाते. कुंपणाचा कायदा आणत आहोत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना मदत झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी आग्रही आहेत. नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील नियम वनविभागाने बदलवायचे आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानासंदर्भात मुनगंटीवार म्हणाले, ज्या आमदारांच्या मतदारसंघात वन्यप्राण्यांकडून शेतांचे नुकसान केले जाते. त्यासाठी आमदारांच्या समित्या तयार केल्या आणि आमदारांनाच त्या समितीचे अध्यक्ष केले. एखादा आरएफओ कुंभकर्णासारखा वागत असेल तर त्यासाठी ही समिती आहे. समितीने याकडे लक्ष द्यायचे आहे. अधिकारी विचित्र वागत असेल तर त्याला समज देणे, चौकशी करणे गरज पडली तर त्याला निलंबित करणे ही कार्यवाही या समितीने करायची आहे.
बीड जिल्ह्यात अग्रिम २५ टक्के दिला जातो. मराठवाड्यात दिला जात नाही, असा आरोप कृषिमंत्र्यांवर केला जात आहे. यासंदर्भात मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कृषिमंत्री मदत करत नाही, हा समज चुकीचा आहे आणि हे काम कृषिमंत्र्यांचे नाही, तर मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे आहे. कृषी मंत्री हे मदत पुनर्वसनाच्या विभागाचे काम करत नाही, असेही ते म्हणाले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.