आमचे अजून ठरले नाही.. अपक्ष आमदारांनी वाढविले दोन्हीकडचे टेन्शन!

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) अपक्ष आमदारांना आलाय भाव!
आमचे अजून ठरले नाही.. अपक्ष आमदारांनी वाढविले दोन्हीकडचे टेन्शन!
Rajyasabha, Chhatrapati Sambhaji rajeSarkarnama

नागपूर : राज्यसभेच्या निवडणुकीची गणिते जुळविण्यात सर्वच राजकीय पक्ष कामी लागलेले आहेत. या निवडणुकीत अपक्षांचे भाव चांगलेच वधारलेले आहेत. प्राप्त माहितीनुसार, राज्यसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांची एक स्वतंत्र बैठक होणार होती. पण अद्याप ही बैठक झाली नाही आणि अपक्षांचे नक्की काही ठरले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसह भाजपचे टेन्शन वाढले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही अपक्ष आमदारांची बैठक घेतली होती. या आमदारांना निधी कमी पडणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यातील एका आमदाराने आपले राज्यसभेला कोणाला मत द्यायचे हे अद्याप ठरले नसल्याचे आज `सरकारनामा`शी बोलताना सांगितले. या अपक्ष आमदाराने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे, हे विशेष. सोलापूर जिल्ह्यातील एका अपक्ष आमदाराने सरकारला सुरवातीला पाठिंबा दिला. त्यांनीही आपला पाठिंबा अद्याप ठरले नसल्याचे सांगत आपल्या मताचे गुपित कायम राखले आहे.

छत्रपती संभाजी राजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) सुरुवातीला अपक्ष लढण्याचा निर्धार जाहीर केल्यानंतर राज्यातील अपक्ष आमदारांकडून त्यांच्या अपेक्षा होत्या. तसे आवाहनही त्यांनी केले होते. तेव्हा ‘आम्ही बैठक घेऊन आमची भूमिका ठरविणार आहोत’, असे काही अपक्ष आमदारांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले होते. त्यानंतर सारे चित्र बदलले. संभाजीराजेंनी माघार घेतली. भाजपने आपला सातवा उमेदवार धनंजय महाडिक यांच्या रूपाने उतरवला. शिवसेनेचे संजय पवार आणि महाडिक यांच्यात सहाव्या जागेसाठी चुरस होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही बाजूंनी अपक्षांना जाळ्यात खेचण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश अपक्ष आमदारांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत. या अपक्ष आमदारांची (MLA's) बैठक झालेली नाही. या निवडणुकीबाबत अपक्ष आमदार सध्यातरी कोणत्या निर्णयावर पोहोचलेले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांसह भाजप (BJP) नेतेही काळजीत पडल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात सहा जागांवर निवडणूक होणार असून सध्या भाजपकडे तीन जागा आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे प्रत्येक एक जागा आहे. सध्याचे संख्याबळ पाहता भाजपला दोन जागा मिळतील. तर आघाडीने आकडे जुळवून आणल्यास एका जागेचा फायदा होऊ शकतो. एकूण 29 आमदार हे छोट्या पक्षांचे किंवा अपक्ष आहेत. त्यांचा पाठिंबा मिळाल्यास राज्यसभेतील चित्र बदलू शकते. महाविकास आघाडीकडे 170 मते असल्याचे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अडीच वर्षांपूर्वी दिसून आले होते. यातील किती मते भाजप आपल्याकडे वळविणार, याची उत्सुकता आहे.

विदर्भातील एका अपक्ष आमदाराशी संपर्क साधला असता त्याने याबाबत काहीच ठरले नसल्याचे सांगितले. हा आमदार मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला हजर होता. तरीही त्याने असे उत्तर दिल्याने या निवडणुकीत अपक्ष मंडळी काही चमत्कार तर करणार नाहीत नाही ना, अशी चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in