अपक्ष आमदार म्हणतात, संजय राऊत यांच्या बोलण्यात तथ्य आहे...

राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान अपक्ष आमदाराचे मत विकल्या गेल्याच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दुजोरा दिलेला आहे.
अपक्ष आमदार म्हणतात, संजय राऊत यांच्या बोलण्यात तथ्य आहे...
MP Sanjay Raut and MLA Narendra BhondekarSarkarnama

भंडारा : राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला पराभव शिवसेनेला चांगलाच जिव्हारी लागला आहे. उद्धव ठाकरेंसारखे येवढे संवेदनशील मुख्यमंत्री असतानासुद्धा मतं फुटली कशी, हा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे. निकाल लागल्यापासून सर्वत्र तीच चर्चा सुरू आहे. यातच खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यात तथ्य आहे, असं अपक्ष आमदारांना वाटते आहे.

निकाल बघून असं वाटतंय की, नक्कीच कुठे ना कुठे गडबड झाली आहे. छोट्या पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदार यांची चौकशी आज ना उद्या होईलच. ज्या वरिष्ठ नेत्यांनी रणनीती आखली, ते चौकशी करतील आणि त्यामध्ये कोण कोण फुटले, हे सत्य बाहेर येणार आहे. निवडणुका काय येतात, जातात. या एका निवडणुकीच्या निकालाने सर्व काही संपले, असे होत नाही. आता पुढे २० तारखेला विधानपरिषदेची निवडणूक आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) विजय होईल, याची खात्री आहे, असे आमदार नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) म्हणाले.

भंडारा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान अपक्ष आमदाराचे मत विकल्या गेल्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्याला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते याची चौकशी करणार असून लवकरच कुणाची मत फुटली याचा खुलासा होणार असल्याचे नरेन्द्र भोंडेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान येत्या 20 तारखेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

MP Sanjay Raut and MLA Narendra Bhondekar
शरद पवार पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत देशाला पर्यायी सरकार मिळणे अशक्य : संजय राऊत

घोडे बाजारामध्ये जी लोक उभी होती त्यांची सहा-सात मते आम्ही घेऊ शकलो नाही.आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे एकही मत फुटले नाही पण कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट नावंच सांगितली. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, देवेंद्र भुयार (अपक्ष), संजय मामा शिंदे (अपक्ष), श्यामसुंदर शिंदे (अपक्ष) यांची मत आम्हाला मिळाली नाहीत. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in