बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक; रवी राणांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ

Amaravati Politics | बच्चू कडू यांचे कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत.
Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu and Ravi RanaSarkarnama

Amaravati Politics अमरावती : अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राणा यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

आमदार बच्चू कडू यांच्यावर आमदार रवी राणा यांनी पन्नास खोक्याच्या संदर्भाने आरोप केला हेाता. त्यानंतर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्यात पुरावे द्यावे अन्यथा कोर्टात खेचण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला होता. शेवटी या वादात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती. यांच्यातील वाद काहीसा शांत झालेला वाटत असतानाच बच्चू कडूंचा आक्रमक बाणा अजूनही काय असल्याचं दिसत आहे.

आज अमरावतीत होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपण आपली भूमिका स्पष्ट कऱणार असल्याचं बच्चू यांनी म्हटलं आहे. आज बच्चू कडू यांच्या नेतृत्तवात कार्यकर्ता मेळावा होणार आहे. बच्चू कडू यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि पदाधिकाऱ्यांनी तीन भूमिका मांडल्याची माहिती आहे. सरकारमध्ये राहायचं, सरकाला बाहेरुन पाठिंबा द्यायचा किंवा आपण तटस्थ राहायचं, अशा भूमिका त्यांनी मांडल्या आहेत. याबाबत कडू आज त्यांची अधिकृत भूमिका जाहीर करु शकतात.

तर दुसरीकडे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचे कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत. मेळावाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ‘मै झुकेंगा नही’ असे पोस्टर्स लावून एक प्रकारे माघार घेणार नसल्याची भूमिका अत्यप्रत्यक्ष सूचित केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांपासून त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रवी राणा मुंबई आणि नवनीत राणा अमरावतीत आहेत. अमरावतीत कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून राणांच्या घराबाहेर हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com