...तर उद्या बच्चू कडूही भाजपमध्ये येतील..

प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar) महानगराध्यक्ष मनोज पाटील यांच्या कुटुंबातूनच भाजपच्या नगरसेविका होत्या.
Bacchu Kadu & Randhir Savarkar
Bacchu Kadu & Randhir SavarkarSarkarnama

अकोला : "पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेला मंत्रिमंडळाची लवकरच मान्यता मिळेल. त्यानंतर केंद्र शासनाकडून त्याला मंजुरी घ्यावी लागणार आहे. तेव्हा आमदारसाहेब तुमचे आम्हाला काम पडेल. केंद्रात (Central Government) तुमची सत्ता आहे व पार्टी शेवटी पार्टीलाच बघते," अशी टोलेबाजी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मंगळवारी (ता.8 फेब्रुवारी) अकोला येथे केली.

Bacchu Kadu & Randhir Savarkar
'हा खेळ देवेंद्र फडणवीसांनी सुरू केला': मलिकांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

अकोला महानगरपालिकेतर्फे अमृत योजनेतून उभारण्यात आलेल्या मलजलशुद्धीकरण केंद्रांच्या उद्‍घाटन प्रसंगी भाजपचे (BJP) आमदार रणधीर सावरकर (Randhir Savarkar) आणि पालकमंत्री कडू यांच्यात ही जुगलबंदी रंगली. आमदार सावरकर म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्याचे काम हे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. त्यांनी लोकभावना जपून काही कामे केली असेल तर त्याला संघर्षाच्या भूमिकेत राहून विरोध करू नये. शेवटी ७० टक्के कायदा व ३० टक्के लोकभावना जपूनच विकास साधता येतो, अशी टोलेबाजी सावरकर यांनी केली व रस्त्याच्या प्रश्नावरून न्यायालयात गेलेल्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) टोला लावत पालकमंत्र्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला.

Bacchu Kadu & Randhir Savarkar
ऐतिहासिक मतदारसंघ; ज्या पक्षाचा उमेदवार जिंकतो त्यांचीच राज्यात सत्ता येते!

त्यावर पालकमंत्री कडू यांनीही भाजपशी जवळीक साधत पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली काढताना केंद्राकडून घ्यावयाच्या मंजुरीसाठी भाजपचे आमदार म्हणून तुमचे लेटरहेडवर पत्र दिले तर लवकर काम होईल. पार्टी शेवटी पार्टीलाच बघते. अशी खोपरखडी मारत द्वेषाचे राजकारण अकोला जिल्ह्यात होत असल्याबाबत खंत व्यक्त केली.

पक्षांच्या भानगडीमुळे एक अपक्ष येथे पाठविला

चार प्रमुख पक्ष हे प्रत्येक ठिकाणी असतात. अकोल्यात आणखी एक पक्ष आहे. या पक्षांच्या भानगडीमुळेच अकोला जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी एक अपक्ष येथे पालमकंत्री म्हणून पाठविला असल्याचे टोलेबाजी कडू यांनी नाव घेता वंचित बहूजन आघाडीवर केली व भाजप-शिवसेनेतील संघर्षावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. शहराच्या विकासासाठी कटीबद्ध राहून आणखी एक विकासाचे पाऊल पुढे टाकताना संघर्षाच्या राजकारणाला पूर्ण विराम देण्याच्या मुद्द्यावर मात्र, सावरकर आणि कडू यांचे एकमत दिसून आले.

राजकारणात कुणाचे काही सांगता येत नाही.

राजकारणात कुणाचे काहीही सांगता येत नाही. कोण कधी कुठे हे सांगता येत नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांच्या कुटुंबातूनच भाजपच्या नगरसेविका होत्या. उद्या बच्चू कडूही भाजपमध्ये येतील, तेव्हा काळजी करू नका, असे सांगून राज्यातील भविष्यातील राजकारणावर सावरकर यांनी केलेली टोलेबाजी उद्‍घाटन कार्यक्रमात हशे पिकविणारी ठरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com