पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; वर्ध्यात खळबळ

महिलेची प्रकृती चिंताजनक, कारण अद्याप अस्पष्टच
vradha
vradha

वर्धा : वर्धा (Vardha) जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) गावात दोन वर्षांपूर्वी घडलेली जळीत कांडांची घटना आजही लोक विसरू शकले नाहीत. त्यात आता वर्ध्यातून पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. वर्ध्यातील पिपरी-मेघे येथील पोलीस वसाहतीमध्ये (Police Quarters) एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोर एका महिलेने स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (9 जानेवारी) रात्री 9:30च्या सुमारास आयसीबी (ICB)ला कार्यरत असलेले पोलीस नवनाथ मुंडे यांच्या घरासमोर एका महिलेने स्वतःवर रॉकेल ओतून जाळून घेतले. बधित महिला ही होमगार्ड असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. इमारतीतील एका फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचं दिसताच इमारतीतील रहिवाश्यांनी धाव घेतल्यानंतर एक महिला फ्लॅट क्रमांक F2 च्या दरवाज्यासमोर जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इमारतीतील नागरिकांनी तात्काळ आग विझवून महिलेला वर्ध्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

vradha
लांब मिशा असलेल्या हवालदाराचे निलंबन, नेटकऱ्यांच्या टीकेनंतर पुन्हा सेवत

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित महिला 60 ते 70 टक्के भाजली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी तिला नागपूरच्या शासकीय दाखल केलं आहे. मात्र, तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप समोर आले नाही. मात्र या घटनेने इमारतीतील नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे. तर या वर्धा पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तिचा जबाब नोंदवता आलेला नाही.

दरम्यान गेल्या दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न केला. एकतर्फी प्रेमातून आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याने भररस्त्यात प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. वर्धा पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पीडित तरूणीला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतही देण्यात आली होती. मात्र १० फेब्रुवारी २०२० रोजी पीडित तरुणीचा दुर्दैवी अंत झाला. डॉक्टरांनीही तरुणीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in