Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Chandrapur : वाघांच्या या भूमीत वज्रमूठ बांधा आणि सांगा की यापुढे विजय आमचाच…

J. P. Nadda : भाजपच्या विजयाचा संकल्प राष्ट्रीय अध्यक्षांनी चंद्रपुरातून सुरू केला, ही मोठी गोष्ट आहे.

Minister Sudhir Mungantiwar News : या विश्‍वातील सर्वात मोठ्या संघटनेचे कर्णधार या शब्दांत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गौरव करीत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज भाषणाची सुरुवात केली. वाघांच्या या भूमीत वज्रमूठ बांधा आणि राष्‍ट्रीय अध्यक्षांना सांगा या यापुढील सर्व निवडणुकांमध्ये विजय आमचाच आहे, असे आवाहन त्यांनी हजारोंच्या जनसमुदायाला केले.

जे. पी. नड्डा (J. P. Nadda) आज महाराष्ट्राच्या विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur) आणि मराठवाड्यातील संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चंद्रपूरच्या जाहीर सभेत मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrashekhar Bawankule) खासदार अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, बंटी भांगडीया, संजीवरेड्डी बोदकुरवार संदीप धुर्वे, देवराव होळी, समीर कुणावार, अशोक उईके, कृष्णा गजबे यांच्यासह धर्मपाल मेश्राम, चंदन व्यास, नितीन भुतडा, अतुल देशकर, संजय धोटे, राजेश बकाने, जमाल सिद्दीकी, अर्चना डेहनकर, किसन नागदेवे आदी उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, नड्डांनी विजयाचा संकल्प चंद्रपुरातून सुरू केला. कन्याकुमारी ते काश्मीर आणि कामरून ते कच्छपर्यंत भाजपच्या विजयाचा संकल्प राष्ट्रीय अध्यक्षांनी चंद्रपुरातून सुरू केला, ही मोठी गोष्ट आहे. रावणाला पराभूत करायचे असेल तर रामापासूनच कहाणी सुरू होते. के फॉर कंसाला हरवायचे असेल, तर के फॉर कृष्णालाचा मैदानात उतरावे लागते. त्याचप्रमाणे सी फॉर कॉंग्रेसला हरवण्यासाठी सी फॉर चंद्रपूरसारखी भूमी असू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय आरोग्यमंत्री असताना जे.पी. नड्डा यांनी आयुष्यमान भारत ही देशातील सर्वात मोठी आरोग्यदायी योजना तयार केली. त्याचा लाभ आज देशवासीयांना होतो आहे.

आजही ‘ती’ खंत आहे..

चंद्रपूर लोकसभा २०१९मध्ये आम्ही जिंकू नाही शकलो. ही खंत मनात आजही आहे. चंद्रपूरच्या जनतेने भाजपला महानगरपालिका दिली, जिल्हा परिषद दिली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक, दोन नव्हे तर तब्बल ६ वेळा निवडून दिले. भाजपचा झेंडा येथे उंचच राहिला आहे. यापुढेही महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा या सर्व निवडणुका आम्हीच जिंकू, असा विश्‍वास मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. इंग्रजांशी लढताना ज्यांनी जिवाची बाजी लावली, त्या वीर बाबूराव शेडमाकेंची ही भूमी आहे. १९३ देशात १४ देशांत वाघ आहेत. त्यात आपल्या देशात जास्त वाघ आहे आणि त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात अधिक वाघ आहेत. ज्या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व मा.सा. कन्नमवार यांनी केले, त्या मतदारसंघाचे नेतृत्व आज माझ्याकडे आले, ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar : '' आघाडी सरकारच्या काळात मीही अग्निपरीक्षा दिली..!'' सुधीर मुनगंटीवार असं का म्हणाले?

सर्वाधिक सुवर्णदान..

भारत-चीन युद्धादरम्यान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा सुवर्णदान करण्याचे आवाहन केले होते, तेव्हा सर्वाधिक दान चंद्रपूर जिल्ह्यातून झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथेच बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. याच भूमीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डॉ. मोहन भागवत हे सरसंघचालक दिले. गोळवलकर गुरुजी आणि सुदर्शनजी यांचे शिक्षण चंद्रपूरच्या ज्युबीली हायस्कूलमध्ये झाले आहे. एका सरसंघचालकांची जन्मभूमी आणि दोन सरसंघचालकांची ही शिक्षाभूमी आहे, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in