व्हायरल व्हिडिओत अनामिक तरुण म्हणतो, नितीन गडकरींनी स्वीकारावे ‘हे’ चॅलेंज...

या व्हिडिओमध्ये या अनामिक युवकाने रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना एक प्रकारे रस्त्याच्या कामासाठी गळ घातली आहे.
व्हायरल व्हिडिओत अनामिक तरुण म्हणतो, नितीन गडकरींनी स्वीकारावे ‘हे’ चॅलेंज...

Nitin Gadkari

Sarkarnama

तेल्हारा (जि. अकोला) ः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणजे पुलकरी आणि रोडकरी, अशी त्यांची ख्याती आहे. तेल्हारा तालुक्यातील खराब रस्त्यांमुळे अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेकांनी हातपाय गमावले. मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांना विनंत्या करून झाल्या. पण काही उपयोग झाला नाही. अखेर एका तरुणाने ओळख जाहीर न होऊ देता एक व्हिडिओ तयार केला आणि गडकरींनी चॅलेंज केले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

अकोला जिल्ह्याच्या (Akola District) तेल्हारा तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सामान्य नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून खराब या रस्त्यांची दखल घ्यावी, अशी मागणी करत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल झालाय. खराब रस्त्याला कंटाळून एका अनामिक इसमाने नाव न जाहीर करता मास्क परिधान करून या रस्त्यांच्या समस्यांबद्दल एक व्हिडिओ तयार केलाय. या व्हिडिओमध्ये या अनामिक युवकाने रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना एक प्रकारे रस्त्याच्या कामासाठी गळ घातली आहे.

गडकरी यांनी तेल्हारा तालुक्यातील रस्ते चांगले करून दाखवण्याचे चॅलेंज स्वीकारावे. कारण भारतातील ते एकमेव असे मंत्री आहेत की काहीही करून दाखवण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यांनी तालुक्यातील रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी या व्हिडिओमधून करण्यात आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून हा व्हिडिओ कोणी बनवला याबाबत काहीही माहिती पुढे आलेली नाही. व्हिडिओ तयार करणाऱ्याने आपला परिचय दिलेला नाही. नितीन गडकरी यांना खराब रस्त्याची ही बाब निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहे, येवढेच तो या व्हिडिओमध्ये सांगतो आहे.

<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari</p></div>
गडकरी म्हणाले, ‘हा’ राज्य सरकारचा विषय, केंद्राचा असता तर मी आत्ता निर्णय घेतला असता..

गेल्या काही वर्षांपासून तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तर चार वर्षांपासून सदर रस्ते खोदून ठेवलेले आहेत. या रस्त्यामुळे अनेक जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. तर कित्येक जण जखमी झालेले आहेत. काही गर्भवती महिलांची रस्त्यातच प्रसूती झाल्याच्या धक्कादायक घटनासुद्धा घडल्या आहेत. तर धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या रस्त्यांवर हजारो नवीन वाहने सुद्धा खिळखिळी झाली आहेत आणि लक्षावधी रुपयांचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.

निष्क्रिय लोकप्रतिनिधी, निगरगट्ट प्रशासन, आणि सहनशीलतेची परिसीमा गाठलेली सुस्त जनता हे सर्व याला कारणीभूत असल्याची हा व्यक्ती सांगतो. या रस्त्यांसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली अनेकदा उपोषणे झाली. अनेक अभिनव आंदोलनसुद्धा केले गेले. परंतु उदासीनतेचा कळस गाठलेल्या लोकप्रतिनिधींना याच्याशी काही घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे ओपन चॅलेंज स्वीकारतात का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.