पूर्वी इंग्रजांचं राज्य चालायचं, अमरावतीत आता पोलिस राज सुरू आहे...

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या १२ तासांत रद्द झाल्या. यावर फडणवीसांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश परत घेण्याचं कारण काय?
पूर्वी इंग्रजांचं राज्य चालायचं, अमरावतीत आता पोलिस राज सुरू आहे...
Devendra FadanvisSarkarnama

नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे १७ एप्रिलला उसळलेली दंगल आटोक्यात आली, पण नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आटोपत नाहीये. पूर्वी इंग्रजांचं राज्य चालायचं आणि आता पोलिसांचं राज्य चालत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दंगलीनंतर पोलिसांनी (Police) आरोपींची धरपकड केली, यामध्ये भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांना टारगेट केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला. त्यानंतर तेथे पोलिस राज सुरू असल्याचे फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले. आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, त्या ठिकाणी सरकारचे मंत्री लांगूलचालन करतात. त्यातून परिस्थिती आणखी वाईट होत चालली आहे. या लांगूलचालनमुळे दोन समाज एकमेकांपुढे उभे ठाकतात. अचलपूरमध्येही नेमके तेच झाले. त्यामुळेच आज तेथे अशी परिस्थिती आहे. तेथे हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे म्हणून तणाव वाढतोय. पोलिसांनी हा प्रकार थांबवावा, असेही ते म्हणाले.

बदल्या रद्द करण्याचे कारण काय?

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या १२ तासांत रद्द झाल्या. यावर फडणवीसांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश परत घेण्याचं काय कारण आहे, हे समजलं पाहिजे. प्रशासकीय चूक झाली, की मागच्या वेळेस १० अधिकाऱ्यांचे बदली आदेश थांबवले आणि नंतरच्या बदली घोटाळा सीबीआयच्या स्कॅनरमध्ये आहे. बदली घोटाळ्यात ते आलेलं आहे. आताही तसा काही प्रकार आहे का, हे समजलं पाहिजे.

पोलखोल थांबवणार नाही..

पोलखोल आम्ही रोज करतोय, ज्यांची पोलखोल होतेय, ते अस्वस्थ आहेत. त्या अस्वस्थतेतूनच ते आमच्या रथावर हल्ले करत आहेत. त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही पोलखोल करणे थांबवणार नाही. पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं तर पोलिसांचीही आम्ही पोलखोल करू, असे फडणवीस म्हणाले. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबत विचारले असता, मला त्याची कल्पना नाही, असे म्हणत त्यांनी विषय संपवला.

Devendra Fadanvis
Video : वळसे पाटील यांना राष्ट्रवादीचा अजेंडा बोलावा लागतो : फडणवीस

नागपुरात आले तर त्यांना सुबुद्धी येईल..

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे नागपूर दौरे वाढले आहेत. आजसुद्धा शिवसेना नेते खासदार संजय राऊत नागपुरात येत आहेत. एका महिन्यात त्यांचा हा दुसरा दौरा आहे. याबाबत विचारले असता, नागपूरच्या मातीत, वातावरणात वेगळेपण आहे. त्यामुळे ते नागपुरात वारंवार आले, तर त्यांना सुबुद्धी येईल, असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.