अवैध गर्भपात प्रकरण : डॉ. कदमची हकालपट्टी, न्यायालयीन कोठडीत रवानगी...

डॉ. नीरज कदमची पोलिस कोठडी (Police custody) संपल्याने काल न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
Police Arrested Dr. Kadam
Police Arrested Dr. KadamSarkarnama

वर्धा/आर्वी : अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांनी (Police) अटक केलेल्या डॉ. नीरज कदमची पोलिस कोठडी (Police custody) संपल्याने काल न्यायालयात (Court) हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या प्रकरणात डॉ. कदमवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याने त्याची शासकीय ग्रामीण रुग्णालयात असलेली सेवा खंडित करून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या झाडाझडतीत मोठ्या प्रमाणात शासकीय औषधसाठा मिळून आला. आर्वी रुग्णालयात आलेला हा औषधसाठा डॉ. नीरज कदमच्या माध्यमातून गेल्याचे पुढे आले आहे. शिवाय या प्रकरणात असलेली सोनोग्राफी मशिन डॉ. रेखा आणि डॉ. नीरज कदम या दोघांच्या नावावर होती. यासंदर्भात आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने तत्काळ बरखास्तीची कारवाई करण्यात आली. हा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी निर्गमित केला. या प्रकरणात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नियमानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कदम रुग्णालयात झालेला अवैध गर्भपात आणि त्यानंतर पोलिसांच्या तपासात सापडलेल्या 12 कवट्या आणि 54 हाडांमुळे राज्यभर चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणात रोज नवनवे पैलू येत असताना आरोग्य विभागाने अद्याप चौकशी अहवाल पूर्ण करून सादर केला नाही. शिवाय पोलिसात कुठली तक्रार केली नाही. यामुळे पोलिसांचा केवळ गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणातच तपास सुरू आहे. यात डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदमला अटक केली तर रुग्णालयात गर्भपात केंद्राचा परवाना असलेल्या डॉ. शैलजा कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अभ्यास करून करणार अहवाल सादर : डॉ. आशा मिरगे

आर्वी येथील प्रकरणात पारदर्शकता राहावी याकरिता आरोग्य संचालकांच्या वतीने एक अभ्यासगट तयार करण्यात आला. या गटात एकूण सहा सदस्य आहेत. हा गट आज आर्वी येथे दुपारी दाखल झाला. त्यांच्या वतीने रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. या पाहणीत नवे काही सापडले नसले तरी झाडाझडती सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. येथे असलेल्या स्थितीचा अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. याकरिता किती वेळ लागेल हे सांगणे कठीण असले तरी शासनाने दिलेल्या कालावधीत हा अहवाल सादर करू असे अभ्यास गट तथा पीसीपीएनडीटी सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी सकाळशी बोलताना सांगितले. या समितीने शेवट पोलिस ठाणे गाठत पोलिसांशी चर्चा केली. यावेळी पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Police Arrested Dr. Kadam
अल्पवयीन गर्भपात प्रकरण; रुग्णालयाच्या परिसरातून काळवीटाची कातडीही जप्त

कदम यांच्या घरातील एक खोली कुलूपबंदच..

पोलिसांनी रुग्णालय आणि कदम यांच्या घराची झडती घेतली. यावेळी घरातील एक खोली कुलूपबंद असल्याचे दिसून आले. शिवाय त्याची किल्ली डॉ. शैलजा कदम घेऊन गेल्या आहेत. या खोलीत नेमके काय हे अद्याप पुढे आले नाही. यामुळे ती किल्ली आणून खोलीचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सीलमुळे औषधी तपासणी पथकाची चौकशी थांबली..

आरोग्य विभागाच्या तपासणीनंतर औषधी प्रशासनाचे पथक रुग्णालयात गेले. येथे त्यांच्याकडूनही तपासणी करण्यात आली. मात्र, रुग्णालयातील कपाट आणि इतर साहित्य सील असल्याने त्यांना पूर्ण तपासणी करणे कठीण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून या प्रकरणात ग्रामीण रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आल्याचे जिल्हा औषधी निरीक्षक एस.एच. चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com