सिंदखेड राजात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, टायर जाळून वाहतूक रोखली...

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी आज दुपारी संतप्त एसटी आंदोलकांनी अचानक ठिय्या आंदोलन केले. चप्पल व दगडफेकही केली.
Agitation for Sharad Pawar's Home attack.
Agitation for Sharad Pawar's Home attack.Sarkarnama

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई (Mumbai) येथील सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी दुपारी एसटी आंदोलकांनी अचानक हल्ला चढवला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यान टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी आज दुपारी संतप्त एसटी आंदोलकांनी अचानक ठिय्या आंदोलन केले. चप्पल व दगडफेकही केली. राज्यातील (Maharashtra) सर्वोच्च नेत्याच्या निवासस्थानी झालेला हा प्रकार माध्यमांनी दाखविताच स्थानिक राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सायंकाळी 5 ते 5.30 च्या सुमारास शेकडो कार्यकर्त्यांनी अचानक बसस्थानक परिसरामध्ये एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन सुरू केले.आंदोलनात रस्त्यावरच टायर जाळून वाहतूक थांबविण्यात आली.

याच वेळी या मार्गावरून जाणाऱ्या दोन रुग्णवाहिका मार्ग मोकळा करून देण्यात आला. कार्यकर्त्यांनी घटनेचा जोरदार निषेध करून घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आंदोलकांवर व त्यांच्या मागे असलेल्या अज्ञात शक्तींना शोधून त्यांच्या विरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, तालुकाध्यक्ष सतीश काळे, शहराध्यक्ष सीताराम चौधरी, शिवाजी राजे जाधव, मंगेश खुरपे, यासीन शेख, रमेश कोठोडे, जगन सहाणे, मधुकर गव्हाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अचानक सुरू झालेल्या आंदोलनाची पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती नव्हती. आंदोलन सुरू झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन राष्ट्रीय महामार्गावरील जळते टायर विझविले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Agitation for Sharad Pawar's Home attack.
हल्ल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया : म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण..."

आंदोलनकर्त्यांची तत्परता..

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सिंदखेड राजा शहरांतील राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरू असताना शेकडो वाहने ठप्प उभी होती. आंदोलन सुरू असतानाच रुग्णांना घेऊन जाणाऱ्या दोन ॲबुलन्स आल्या. ॲम्बुलन्सचा सायरन वाजतात आंदोलनकर्त्यांनी तत्परता दाखवत कार्यकर्त्यांना बाजूला करून दोन्ही रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले. आंदोलनामध्येसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत ॲम्बूलन्सला रस्ता मोकळा करून दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com