नागपूरात भाजपच्या '१२० प्लस'ला पक्षातूनच आव्हान

आगामी महापालिका निवडणुकीत नागपूर महापालिकेवर (NMC) सत्ता काबीज करण्यासाठी राज्यात सत्तेत असलेल्या कॅाग्रेसने (Congress) सुद्धा जोर लावला आहे.
NMC
NMCSarkarnama

नागपूर : आगामी महापालिका निवडणुकीत नागपूर महापालिकेवर (NMC) पुन्हा सत्ता काबीज करण्याच्या इराद्याने भाजपने (BJP) '१२० प्लस' जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. यासाठी नियोजन आणि तयारी सुद्धा जोरात सुरु करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे अंतर्गत धुसफुस, निष्क्रिय नगरसेवकांबद्दलची नाराजी, नेत्यांमधील हेवेदावे आणि आपसातील सुप्त स्पर्धा याचाही सामना करण्याचे आव्हान मात्र, पक्षापुढे उभे ठाकले आहे.

NMC
भाजपच्या 12 निलंबित आमदारांचा हुरूप न्यायमूर्तीच्या त्या एका वाक्याने वाढलाय...

गत निवडणुकीत काँग्रेस नेत्यांनी आपसात भांडून आणि एकमेकांचा पत्ता साफ करून महापालिका भाजपला दानच केल्यासारखा गमावली होती. त्यामुळे दीडशेंपैकी १०८ जागा जिंकून भाजपने विक्रम नोंदवला होता. आता किमान हा आकडा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. तत्पूर्वी विधानसभेच्या सहापैकी सहा जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र, पाच वर्षांतच उत्तर आणि पश्चिम नागपूरची जागा भाजपला गमवावी लागली. मध्य आणि दक्षिण नागपूर कसेबसे बचावले. अन्यथा मोठे भगदाड भाजपला पडले असते. काँग्रेसमधील भांडणे पूर्णपणे संपलेली नाहीत, मात्र, त्याची तीव्रता कमी झाल्याचे दिसते. राज्यात काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे यंदा काँग्रेस लढण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. ते बघता महापालिकेत पंधरा वर्षांपासूनची सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला चांगलीच मशागत करावी लागणार आहे.

NMC
विरोधी पक्षाच्या नेत्यानं थेट भाजप मुख्यालयासाठी पाठवलं कुलूप!

दरम्यान, चार सदस्यीय प्रभागपद्धतीमुळे नाराजीत आणखी भर पडली आहे. निम्म्या नगरसेवकांनी कामच केले नाही. त्याचा फटका निश्चितच भाजपला बसणार असल्याचे सध्यातरी दिसून येते. चार सदस्यांमधून निवडून आल्यानंतर अनेक नगरसेवकांना प्रभागातील जनतेने बघितलेच नाही. त्यांच्या तक्रारी ऐकल्या नाहीत. समस्याही सोडवल्या नाही. प्रभागातील एकाच नगरसेवकांवर भार टाकून इतर तिघे फक्त नगरसेवक म्हणून मिरवत आहे. पक्षातर्फे वारंवार इशारा आणि तिकीट कापण्याचे संकेत दिल्यानंतरही कोणी सक्रिय झाल्याचे सध्यातरी दिसत नाही.

हीच टीम कायम ठेवल्यास भाजपला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. थोड्याफार फरकांनी पराभूत झालेल्या विरोधी पक्षाचे माजी नगरसेवक व उमेदवारांनी ही पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यामुळे यंदा उमेदवारी देताना भाजपला चांगलीच काळजी घ्यावी लागणार आहे. आमच्या नगरसेवकांनी घाण केल्याचे भाजपचे दुसऱ्या फळीतील व निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले उमेदवारसुद्धा उघडपणे बोलत आहे. त्यामुळे यंदा पक्षाने उमेदवारी दिली तर कसे होणार याची चिंता अनेकांना सतावत आहे.

NMC
`शिवसेनेची लढाई ही त्यांच्या उमेदवारांचे डिपाॅझिट वाचविण्यासाठी`

सर्वे करुन दिली जाणार उमेदवारी

उमेदवारी देण्यापूर्वी सर्वे केला जाईल. जो जनतेत असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. मात्र, भाजपची पूर्ण तयारी सुरू आहे. बूथ कमेट्‍यांपासून पालक कमेटीच्या बैठकी आटोपल्या आहेत. देवेंद्र फडणवीस प्रत्येक बूथ फिरले. आमदारही तयारीला लागले आहेत. पंधरा वर्षात भाजपने केलेली कामे जनतेपुढे आहे. इतर शहराच्या तुलनेत शहर कसे आणि किती बदलेले सर्वांच्या डोळ्यांनी दिसत आहे. ते सांगायची गरज नाही. त्यामुळे १२० चा आकडा गाठणे भाजपला अवघड नसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटकेंनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com