CEO सौम्या शर्मांना त्यांच्याच कक्षात विद्यार्थी म्हणाले, मॅडम तुम्ही येथे कशा आल्या?

CEO : शिस्तीच्या कडक असलेल्या सौम्या शर्मा यांच्या रूबाब काही वेगळाच आहे.
CEO Soumya Sharma with Students
CEO Soumya Sharma with StudentsSarkarnama

CEO Soumya Sharma News : सौम्या शर्मा नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेच्या सीईओ आहेत. गेल्याच महिन्यात त्या येथे रुजू झाल्या. आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याचा दराराच वेगळा असतो. त्यातल्या त्यात शिस्तीच्या कडक असलेल्या सौम्या शर्मा यांच्या रूबाब काही वेगळाच आहे. पण काल जिल्हा परिषदेत (ZP) आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले की, ‘मॅडम तुम्ही येथे कशा आल्या...?’

यामध्ये चक्रावून जाण्याचे काही कारण नाही. काल नरखेड तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थी जिल्हा परिषद कार्यालयात आले होते. येथे त्यांच्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी (CEO) अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासोबत विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना निरागसपणे प्रश्‍न विचारणे सुरू केले आणि सीईओंनीसुद्धा त्यांच्या सर्व प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरे दिली. मॅडम, तुम्ही येथे कशा आल्या, काय काम करता, किती शिकल्या, अशा प्रश्नांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौम्या शर्मा यांना सामोरे जावे लागले.

सावरगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील ६२ विद्यार्थ्यांना काल जिल्हा परिषदेची सहल घडविण्यात आली. या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. विद्यार्थ्यांना शाळा, अभ्यासाव्यतिरिक्त ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी म्हणून शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत तेथील मुख्याध्यापक व उपक्रम प्रमुख वीरेंद्र वाघमारे यांच्या नेतृत्वात ६२ मुली-मुलांनी नागपुरातील रमन सायन्स सेंटर, दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, अजब बंगला अशा स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर शिक्षण विभागाने मुलांना प्रशासनाची जाणीव, अधिकाऱ्यांच्या भेटी व्हाव्यात म्हणून ‘एक भेट सीईओंना’या उपक्रमाचे आयोजन काही क्षणातच केले.

CEO Soumya Sharma with Students
`सीईओ`च्या आदेशाने `जिप` कर्मचाऱ्यांची झोप उडाली

काल दुपारी हे सर्व चिमुकले प्रथम शिक्षण विभाग प्राथमिकमध्ये त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये भेटीला गेले. याशिवाय, जिल्हा परिषदेच्या काही विभागांची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर सीईओ शर्मा यांची सदिच्छा भेट घेऊन सहलीला निरोप द्यायचे ठरले. सीईओंनी उभे राहून त्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती दिली. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमांतून कसे यश संपादन करीत या खुर्चीपर्यंत कसे पोहोचता येते, हेही सांगितले. अनेकानेक प्रश्नांना उत्तरे दिली. आबासाहेब खेडकर सभागृह पाहून विद्यार्थी थक्क झाले. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर, उपशिक्षणाधिकारी सुशील बन्सोड, समग्र शिक्षा साहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in