Grampanchayat Results : बोदरा-देऊळगावमध्ये सासु-सुनेच्या लढतीत सुनेने मारली बाजी...

Gondia : सुन किरण मिलिंद ढवळे यांनी सासू मंदा योगिराज ढवळे यांचा पराभव केला.
Gondia
GondiaSarkarnama

Grampanchayat Election Results : गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतीमध्ये एकाच कुटुंबातील सासू आणि सून सरपंच (Sarpanch) पदाकरिता निवडणूक (Election) रिंगणात आमने-सामने उभ्या होत्या. मतमोजणीनंतर निकाल हाती आले असून सुन किरण मिलिंद ढवळे यांनी सासू मंदा योगिराज ढवळे यांचा पराभव केला. सासू आणि सून दोघींनीही अपक्ष निवडणूक लढवली.

सरपंचपदी सून निवडून आल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. साधारणपणे घरात सासू आणि सुनेमध्ये वर्चस्वाची लढाई नेहमीच बघण्यात येते. पण गावाची कारभारी बनण्यासाठी सासू-सुनेमध्ये थेट लढत झाली. १६५० लोकसंख्या असलेल्या या गावाच्या १० सदस्यीय (९+१) गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. १५ वर्षांनंतर या ग्राम पंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी महिला सरपंचपद राखीव झाले होते. गावात प्रभावी महिला किरण ढवळे यांची ओळख होतीच. गावातील स्थानिक नेत्यांनी सर्व धर्म समभाव पॅनलतर्फे त्यांना सरपंचपदासाठी निवडणुकीत उभे केले होते.

Gondia
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

किरण मिलिंद ढवळे आपल्या काकेसासू विरुद्ध अपक्ष सरपंच पदासाठी निवडणुकीत उभ्या होत्या. एका डेली सोपच्या जाहिरातीला शोभेल अशी लढत बोदरा देऊळगावमध्ये झाली. लोकांचे अंदाज दररोज बदलत होते. अखेर यामध्ये सुनेने बाजी मारली. ढवळे कुटुंबाचे नातेवाईक या निवडणुकीत पेचात पडले होते. नातेवाइकांनी कोणाच्याही प्रचारात सामील न होता सावध पवित्रा घेतला होता. पण त्यांनी सुनेलाच साथ दिल्याचे सिद्ध झाले. दोघींनीही जोमात प्रचार केला होता. आपण निवडून आल्यास काय फायदा होईल, हेसुद्धा दोघींनी गावकऱ्यांना पटवून दिले. ही निवडणूक काटे की टक्कर, अशीच झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com