
नागपूर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भारतीय जनता पक्षाला १०५ आमदार निवडून दिले, त्याचा आज महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांना होतो आहे. हे सरकार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देतानाच मी सांगितलं होतं, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लवकरच सर्व काही कळेल, त्याचं प्रत्यंतर यायला आता सुरुवात झाली आहे, असे नाना पटोले म्हणाले.
मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना (Nana Patole) म्हणाले, भाजपचे दिल्लीचे (Delhi) नेतृत्व असो की महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे हे फार चांगले व्यक्ती आहेत, म्हणून त्यांना मुख्यमंत्री केले, असे काहीच नाहीये. प्रत्यक्षात त्याची कारणे वेगवेगळी आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी परवा परवा त्याची कबुली दिली आहेच. ते असं म्हणाले होते की, ‘मनावर दगड ठेवून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.’, यातच महाराष्ट्रातील जनतेला सर्व काही कळून चुकले आहे. चंद्रकांत दादांच्या (Chandrakant Patil) त्या वाक्याचा अर्थ आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजून घेतला पाहिजे, नाहीतर वेळ निघून गेल्यावर पस्तावण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही राहणार नाही. मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) उद्याचा धोका मोठा आहे.
काल भीमशक्ती मेळावा आणि चिंतन बैठक होती. त्यासाठी मीसुद्धा गेलो होतो. विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना दिलेल्या मतांपैकी ६ मते फुटली होती. त्याचा राग भीमशक्तीच्या नेत्यांना मनात असणे स्वाभाविक आहे. आम्हालाच राग आला, तर त्यांना राग येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडून त्यांची अपेक्षा आहे की, ज्या लोकांना ही गडबड केली, त्यांच्यावर कारवाई केली जावी. असे असले तरी आम्ही कॉंग्रेससोबत होतो, आहोत आणि भविष्यातही कॉंग्रेससोबत राहू, असा विश्वास हांडोरे यांनी काल व्यक्त केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
सध्या दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्येही विरोधकांचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. या सर्व हालचाली बघता आमचं हायकमांड गंभीर आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल, याचा विश्वास आहे. भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना नोटीस दिली आहे. पण कॉंग्रेस नेत्यांची केलेल्या आरोपांचे पुरावे दिलेले आहेत. खोटं बोला, पण रेटून बोला, या उक्तीनुसार भाजप भाजप नेते काम करतील. पण मी आमच्या गोव्याच्या कार्यकर्त्यांशी बोललो, तर ते म्हणाले की, आपल्या नेत्यांचे म्हणणे बरोबर आहे. त्यामुळे आता पुढे काय होईल, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
गाय ही मध्य भारतामध्ये आई असते. उत्तर पूर्व मध्ये ती आई नसते आणि गोवा केरळकडे गेल्यावर गाय आई नसते तर ती खायची वस्तू असते, असे भाजपचं राजकीय समीकरण आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपची भूमिका ही सोयीस्करपणे बदलत असते. त्यामुळे भाजप नेत्यांच्या वक्तव्याला किमान गायीसंदर्भातल्या तरी महत्व देण्याची गरज नाहीये.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.