अरोली-कोदामेंढीत कॉंग्रेसचे देशमुख विजयी, भाजपचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर...

अरोली कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार योगेश देशमुख Yogesh Deshmukh of Congress निवडून आले असून दुसऱ्या स्थानी सेनेचे प्रशांत भुरे यांनी मजल मारली.
ZP elections resulth of aroli kodamendhi
ZP elections resulth of aroli kodamendhiSarkarnama

संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि. नागपूर) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक काल पार पडली. मतदान प्रक्रियेनंतर सर्वच पक्षांचे नेते दावे प्रतिदावे करीत होते. आपलाच उमेदवार निवडून येणार असे छाती ठोकून सांगत असले तरी सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांमध्ये धाकधूक सुरू होती. आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. चारही फेऱ्यामध्ये काँग्रेसचे योगेश देशमुख पहिल्या स्थानी होते. अंतिम फेरीचा निकाल देखील काँग्रेसचे योगेश देशमुख यांच्या बाजूने लागला. ते २५३४ मताधिक्क्याने निवडून आले.

तालुक्यात अरोली कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्रासाठी तर रेवराल, खात आणि चिरव्हा पंचायत समितीच्या गणासाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या होत्या. अरोली कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार योगेश देशमुख निवडून आले असून दुसऱ्या स्थानी सेनेचे प्रशांत भुरे यांनी मजल मारली. काँग्रेसचे योगेश देशमुख यांना ६२९३ मते मिळाली तर सेनेचे प्रशांत भुरे यांना ३७५९ मते मिळाली. मात्र भाजप तिसऱ्या स्थानी राहिली असून भाजपचे सदानंद निमकर यांना ३४५६ मतांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत काँग्रेसचे योगेश देशमुख यांनी ४०३२ मतांनी भाजपचे अशोक हटवार यांचा पराभव केला होता.

यावेळी योगेश देशमुख यांना टक्कर देण्यासाठी भाजपने उमेदवार बदलविला असून सदानंद निमकर यांची वर्णी लावली. मात्र झाले उलट. सेनेचे प्रशांत भुरे हे दुसऱ्या स्थानी तर भाजपचे सदानंद निमकर यांना मतदारांनी तिसऱ्या स्थानावर फेकले. या क्षेत्रात सात उमेदवार रिंगणात होते. योगेश देशमुख यांच्या निवडीसाठी कॉंग्रेसने चांगलीच कंबर कसली होती. हेवीवेट मंत्री सुनील केदार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आदींसह नेत्यांच्या सभा लावण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा देशमुख यांना झाला असून महागाईची झळ देखील भाजपला भोवली असल्याचे बोलल्या जात आहे.

खात पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या दुर्गा ठाकरे यांना ३४१६ मते मिळाली असून दुसऱ्या स्थानी भाजपच्या शानू वैध आणि सेनेच्या वर्षा गिरीपुंजे यांनी समांतर २०५१ मते मिळाली. काँग्रेसच्या दुर्गा ठाकरे यांचा १३६५ मतांनी विजयी झाल्या. रेवराल पंचायत समिती गणातून काँग्रेसचे स्वप्नील श्रावणकर यांना २००९ मते मिळाली असून दुसऱ्या स्थानी भाजपचे रामेश्वर लिचडे यांना १९९९ मते मिळाली. काँग्रेसचे स्वप्नील श्रावणकर यांचा १० मतांनी निसटता विजय झाला. सेनेच्या मनोज कोठे यांना १८८९ मतावर समाधानी राहावे लागले. चिरव्हा पंचायत समिती गणातून मागील निवडणुकीत काँग्रेसच्या दुर्गा राजेश ठवकर ह्या ९६० मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांनी भाजपच्या नीलिमा घाटोळे यांचा पराभव केला होता.

ZP elections resulth of aroli kodamendhi
जिल्हा परिषद पोटनिवडणूक : नागपुर तालुक्यात कॉंग्रेसचा दणदणीत विजय

आता भाजपने उमेदवार बदलवून पायल पिकलमुंडे यांची वर्णी लावली. त्याचा फायदा भाजपला झाला. भाजपच्या पायल पिकलमुंडे यांना ३९९५ मते मिळाली. काँग्रेसच्या दुर्गा ठवकर यांना ३८४९ मते मिळाली असून भाजपच्या पायल पिकलमुंडे १४७ मतांनी निवडून आल्या. निवडणूक प्रक्रिया साडेबाराच्या सुमारास आटोपली असून शांततेत आणि पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडली. विजयी उमेदवारांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर आणि आपापल्या गावांत गुलाल उधळीत ढोल ताशांच्या निनादात विजयी जल्लोष साजरा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com